Earth Mini-Moon: सुर्यमाला आणि ग्रहांच्या विश्वातली एक महत्वाची समजली जाणारी घटना घडणार आहे. आपल्या पृथ्वीला तात्पुरता दुसरा चंद्र मिळणार आहे. पृथ्वी आणि चंद्राच्या जन्मावर शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्ष संशोधन करत असताना नुकतंच चंद्राचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं संशोधन प्रसिद्ध झालं असताना आता पृथ्वीला दुसरा चंद्र मिळणार आहे. काही काळ पृथ्वीभोवती फिरून तो सुर्याभोवती परिभ्रमण करणार असल्याचं अमेरिकन ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीनं प्रकाशित केलेल्या अहवातून समोर आलंय.
नक्की काय होणार?
पृथ्वीच्या जवळ सध्या 2024 PT5 नावाचा लघूग्रह येत असून अंतराळात केवळ ३३ फूट लांब अंतरावर हा लघूग्रह आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणानं तो पकडला जाईल आणि त्याचा पुढचा प्रवास सुरु ठेवण्यापूर्वी अर्धी फेरी पृथ्वीभोवती फिरून सुर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी पुढे जाईल. अमेरिकन ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
< class="twitter-tweet">
Earth is about to gain a temporary mini-moon—asteroid 2024 PT5. Discovered on August 7, 2024, this asteroid is roughly 10 meters (33 feet) in diameter and will be captured by Earth's gravity from September 29 to November 25, 2024.
During this time, the asteroid will loop around… pic.twitter.com/xDZERy3CsS
— Erika (@ExploreCosmos_) September 13, 2024
गुरुत्वाकर्षण शक्तीनं हा लघुग्रह खेचला जाणार
पृथ्वीला तात्पुरता एक लघुचंद्र मिळणार आहे. अंतराळात सध्या ३३ फूट लांब अंतरावर सध्या एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. 7 ऑगस्ट 2024 रोजी शोधण्यात आलेला हा लघुग्रह सुमारे 10 मी व्यासाचा आहे. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पकडला जाईल. या काळात हा ग्रह पृथ्वीभोवती फिरेल पण ही प्रदक्षिणा पूर्ण होणार नाही. दोन महिन्यांनंतर, हा लघुग्रह सुर्याभोवती फिरण्यास परत येईल.
विज्ञान समुदायामध्ये मिनी-मून्स महत्त्वाचे
द न्यूयॉर्क टाइम्समधील एका अहवालात हार्वर्ड आणि स्मिथसोनियन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्समधील लघुग्रह डायनॅमिक्स संशोधक फेडेरिका स्पोटो यांचा हवाला दिला आहे, असे म्हटले आहे की "हे खूपच छान आहे" आणि 2024 PT5 शास्त्रज्ञांना अंतराळ खडकांबद्दल अधिक ज्ञान मिळविण्यात मदत करू शकेल. विज्ञान समुदायामध्ये मिनी-मून्स महत्त्वाचे मानले जातात, कारण त्यात मौल्यवान धातू असतात. जेव्हा ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने आकर्षित होतात, तेव्हा ते त्या मौल्यवान धातूंचे उत्खनन करण्याची शक्यता उघडते.