नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पाच टप्प्यांतील मतदान संपलं, तरी प्रचाराची रणधुमाळी काही संपलेली नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी केला होता, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राजधानी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरील सभेत मोदी बोलत होते.

'राजीव गांधी आपल्या सासरच्या मंडळींसोबत आयएनएस विराट या युद्धनौकेवरुन सुट्टीवर गेले होते. दहा दिवस सर्व जण एका बेटावर राहिले. तिथे युद्धनौकेवरील कर्मचारीवर्ग त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. हा देशाच्या सुरक्षेसोबत खेळ नाही का?' असा सवाल मोदींनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळालेली 'ती' 9 प्रकरणं कोणती?


'बुलेटप्रूफ भिंतीत राहण्याची मला सवयही नाही, आणि हौसही नाही' असं म्हणत मोदींनी सभेला सुरुवात केली होती. 'दिल्ली मेट्रोने प्रवास करताना मी लोकांच्या गराड्यात असतो. ते क्षण अविस्मरणीय असतात. तुमचं प्रेमच मला ऊर्जा देतो. गेल्या पाच वर्षांत देशात जे मोठे आणि कठोर निर्णय घेतले गेले, त्यात तुम्ही मला साथ दिली. नेते आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरुन वीआयपीचा लाल दिवा उतरण्यामागे तुम्ही कारणीभूत आहात. आज पूर्ण सरकार एका मोबाईलमुळे तुमच्या आवाक्यात आली, त्याचं श्रेयही तुम्हाला' असं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्याची परंपरा निवडणूक आयोगाने कायम राखली आहे. राजीव गांधींना भ्रष्टाचारी म्हणण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने त्यांना दिलासा दिला आहे. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन नसल्याचा निर्वाळा देत याआधी विविध नऊ प्रकरणांमध्ये मोदींना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे.
संबंधित बातम्या

निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'त्या' दोन प्रकरणी क्लीन चिट

'मोदीजी, लढाई संपली असून तुम्ही केलेलं कर्म तुमची वाट पाहात आहे