पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळालेली 'ती' 9 प्रकरणं कोणती?
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2019 07:55 PM (IST)
आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन नसल्याचा निर्वाळा देत विविध नऊ प्रकरणांमध्ये मोदींना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट देण्याची परंपरा निवडणूक आयोगाने कायम राखली आहे. राजीव गांधींना भ्रष्टाचारी म्हणण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने त्यांना दिलासा दिला आहे. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन नसल्याचा निर्वाळा देत याआधी विविध नऊ प्रकरणांमध्ये मोदींना निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे. मोदींना क्लीन चिट मिळालेली 'ती' वाक्यं 1. वर्धा, महाराष्ट्र (1 एप्रिल) - हिंदूबहुल मतदारांचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची काही पक्षांच्या नेत्यांना भीती वाटते. जिथे अल्पसंख्याक समाजाचं प्राबल्य आहे, तिथून काही जण निवडणूक लढवत असल्यावरुन हे सिद्ध होतं. 2. लातूर, महाराष्ट्र (9 एप्रिल) - मला नवमतदारांना सांगायचं आहे, तुमचं पहिलं मत पुलवामातील शहीद जवानांना समर्पित असणार का? (माकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार) 3. बारमेर, राजस्थान (21 एप्रिल) - पाकिस्तानच्या धमक्यांना भीक घालण्याचं धोरण भारताने थांबवलं आहे. दर दुसऱ्या दिवशी ते म्हणतात आम्ही अण्वस्त्रसज्ज आहोत. मग आमच्याकडे काय आहे? आम्ही बॉम्ब दिवाळीसाठी ठेवले आहेत का?