Nag Panchami : श्रावण महिन म्हटलं की सणासुदीचा महिना. भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित करण्यात येतो. आपल्याकडे (महाराष्ट्रात) पंचाग प्रतिपदा ते अमावस्या असा श्रावन महिना असतो तर उत्तरेकडे प्रतिपदा ते पौर्णिमा असा श्रावण महिना साजरा करतात.


शुक्ल पक्ष पंचमीला नागपंचमी साजरी करण्यात येते. नागपंचमीचं पर्व हरियाली तीजनंतर दोन दिवसांनी साजरं केलं जातं. यावेळी महिला नाग देवतेची पूजा करतात. यंदा, 25 जुलै शनिवारी नागपंचमी साजरी होतेय. या दिवशी प्रथेनुसार सापांना दूध पाजलं जातं. नागपंचमीला केलेली पूजा नागदेवतांकडे पोहोचते, अशी अख्यायिका आहे. सापांना हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं.

नागपंचमीला काही मंत्र पवित्र मानले जातात. त्यातील काही महत्वाचे मंत्र.
नाग पंचमी पूजा मंत्र
सर्वे नागाः प्रीयन्तां मे ये केचित् पृथ्वीतले.
ये च हेलिमरीचिस्था येऽन्तरे दिवि संस्थिताः॥
ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिनः.
ये च वापीतडगेषु तेषु सर्वेषु वै नमः॥

मंत्राचा अर्थ – या जगात आकाश, स्वर्ग, झरने, विहिरी, तलाव आणि सूर्य किरणांमध्ये निवास करणाऱ्या सर्पदेवा, आम्हाला आशीर्वाद दे, आम्ही तुला नमन करतो.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्.
शङ्ख पालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्.
सायङ्काले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः.
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥

मंत्राचा अर्थ – नऊ नाग देवतांची नावं अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शङ्खपाल, धृतराष्ट्र, तक्षक तथा कालिया आहेत. रोज सकाळी यांचा जप केल्यास नागदेवता आपल्याला सर्व पापांपासून सुरक्षित ठेवेल, तसंच जीवनात आपल्याला विजयी करेल, असं यात म्हटलंय.

नाग पंचमी पूजा मुहूर्त
पंचमी तिथी आरंभ– 24 जुलै, दुपारी 2.36 वाजल्यापासून
पंचमी तिथी समाप्त – 25 जुलै, दुपारी 12.6 वाजेपर्यंत

नाग पंचमी पूजा विधी ( Nag Panchami Puja Vidhi )
नागपंचमी दिवशी अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शङ्खपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नागदेवतांची पूजा केली जाते. नागाच्या चित्राची किंवा मातीच्या सापाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात महिला वारुळाची पूजा करतात. तसेच आदल्या दिवशी भावाचा उपवास देखील धरतात.