मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जातं. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे अनेकजण रोजगारासाठी येतात. कठोर परिश्रमाने कोट्यधीश किंवा अब्जाधीश होतात. या श्रीमंत शहरातील कोट्यधीश आणि अब्जाधीशांची संख्या किती आहे, हे जाणून घेण्यासाठी नुकताच एका संस्थेने सर्वे करुन आपला आहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार, सध्या 820 मुंबईकरांकडे अब्जो डॉलर्सची संपत्ती आहे, तर 45000 कोट्यधीश आहेत आणि 28 जण अब्जधीश आहेत.


न्यू वर्ल्ड वेल्थने या संबंधीचा आहवाल प्रकाशित केला असून जून 2016पर्यंत देशातील श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीपैकी, त्यांची स्थावर मालमत्ता, रोख रक्कम, शेअर, व्यवसाय आदींची आकडेवारी दिली आहे. या आहवालात सरकारी कोषातील आकडेवारींचा समावेश नाही.

आहवालात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईनंतर दिल्ली आणि बंगळुरु आदी ठिकाणांचा समावेश आहे. सध्या दिल्लीत 450 जणांकडे अब्जो डॉलर्सची संपत्ती आहे, तर 22000जण कोट्यधीश आहेत आणि 18 जण अब्जाधीश आहेत. दिल्लीनंतर नंबर असलेल्या बंगळुरुमध्ये 320 जणांकडे अब्जो डॉलर्सची संपत्ती आहे, तर 7500 कोट्यधीश आणि आठजण अब्जाधीश आहेत. या सर्वांकडे जी संपत्ती आहे, ती वैयक्तीक संपत्ती असल्याचेही संस्थेने आपल्या आहवालात नमुद केलं आहे.

या रिपोर्टनुसार, देशात एकूण 5600 जणांकडे अब्जो डॉलर्सची संपत्ती आहे. तर  2 लाख 64 हजार जण कोट्यधीश आणि 95 जण अब्जाधीश असल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच देशातील नव्याने उभारी घेणाऱ्या शहरांचीही या आहवालात माहिती देण्यात आली आहे. यात सुरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, चंदीगढ, जयपूर आणि वडोदरा आदी शहरांचा समावेश आहे.