राष्ट्रीय रायफल्स'च्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तिघांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2016 07:38 AM (IST)
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : हंदवाडातील लंगेटमधील '30 राष्ट्रीय रायफल्स'च्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मात्र भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक अजूनही सुरु आहे. सध्या या परिसरात जमावबंदी करण्यात आली असून, कसून तपासणी सुरु आहे. हंदवाडातील लंगेटमधील '30 राष्ट्रीय रायफल्स'च्या कॅम्पवर हल्ला करत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय रायफल्सवर निशाणा साधला. '30 राष्ट्रीय रायफल्स'च्या लष्करी कॅम्पवर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्यानेही दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये सलग 15 ते 20 मिनिटं गोळीबार सुरु होता. गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला. राष्ट्रीय रायफल्सचा परिसर, जिथे दहशतवादी हल्ला झाला, त्या साऱ्या परिसरात भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. हंदवाडामधील '30 राष्ट्रीय रायफल्स'चं कॅम्प बारामुल्लाच्या राष्ट्रीय रायफल्स कॅम्पच्या अगदी जवळच आहे. तीन दिवसांआधी बारामुल्लाच्या '46 राष्ट्रीय रायफल्स' कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बारामुल्लातील हल्ल्यानंतरही दहशतवाद्यांनी पळ काढला होता.