Mulayam Singh Yadav Passes Away : माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा (Samajwadi Party) मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचं निधन झालं आहे. यानंतर त्यांचे पुत्र अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचं सोमवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं. त्यांच्यावर गुरुग्राम (Gurugram) येथे मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) उपचार सुरु होते.
अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया
समाजवादी पार्टीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'माझे आदरणीय वडील आणि सर्वांचे नेते आता आपल्यामध्ये नाहीत.' मुलायम सिंह यादव यांचं सोमवारी सकाळी 8.16 मिनिटांनी मेदांता रुग्णालयात निधन झालं. त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'मी मुख्यमंत्री असताना मुलायम सिंह यादव यांच्याशी माझा अनेक वेळा संबंध आला. मी नेहमीच त्यांची मते ऐकण्यासाठी उत्सुक असायचो. त्यांच्या निधनामुळे दु:ख झालं. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.'
शरद पवार यांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी मुलायम सिंह यांच्या निधानवर शोक व्यक्त करत म्हटलं आहे की, लोहियांच्या विचारसरणीवर मुलायम सिंह यादव यांनी राजकीय वाटचाल केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणातही लक्ष दिलं. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. सगळ्या विरोधकांनी एकत्र यावे अशी इच्छा होती. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने वैयक्तिक नुकसानही झालं आहे. देशातील समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झालंय असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.