नवी दिल्ली : रियल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुप आणि टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचं अखेर ब्रेक अप झालं आहे. धोनी यापुढे आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अँबेसेडर नसेल. त्यामुळे धोनी यापुढे आम्रपाली ग्रुपच्या जाहिराती करणार नाही.


 

धोनीचे बिझनेस पार्टनर अरुण पांडे यांनी याबाबतची माहिती ABP न्यूज नेटवर्कला दिली. 'आम्रपाली ग्रुप'सोबतचा करार संपल्याने यापुढे धोनी त्या ग्रुपच्या जाहिराती करणार नसल्याचं अरुण पांडे यांनी सांगितलं.

 

आम्रपाली बिल्डरने वेळेत घरं न दिल्याने या घरांच्या जाहिराती करणाऱ्या धोनीविरोधात सोशल मीडियावर मोहिम उघडण्यात आली होती. धोनीने आमची घरं मिळवून द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत होती.

 

आम्रपाली बिल्डर्स आणि कॅप्टन कूल माही यांचं नातं 6 वर्ष जुनं होतं. जेव्हा धोनी स्टार नव्हता, तेव्हा आम्रपाली बिल्डर्सने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी धोनीचाच चेहरा वापरण्यात येतो. मात्र याच नात्यामुळे धोनीचे हात दगडाखाली आले. आम्रपाली बिल्डरच्या आडमुठेपणामुळे जेरीस आलेल्या ग्राहकांनी ट्विटरवर धोनीविरोधातच मोहीम सुरु केली होती.

 

या प्रकारानंतर धोनीने आता आम्रपालीसोबतचा करार संपुष्टात आणला आहे.

संबंधित बातम्या


धोनी आम्हाला घर मिळवून दे, 'आम्रपाली'च्या ग्राहकांचा तगादा


फसव्या जाहिरातीतील सेलिब्रेटींना 10 लाख दंड आणि तुरुंगवास?


'सेलिब्रेटींना जबाबदार धरता येणार नाही', धोनीच्या बचावासाठी किंग खान सरसावला