मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये गोवा राज्य सर्वाधिक मतदान झाल्याने चर्चेत आलं होतं. पण आता मतमोजणीनंतर गोवा चर्चेत आलं आहे, ते म्हणजे सर्वाधिक मतदारांनी नोटाला पसंती दिल्यामुळे.


गोव्यातील 1.2 टक्के (10, 829) मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. म्हणजे गोव्यातील 1.2 टक्के मतदारांनी एकाही पक्षाला मतदान दिलं नाही. गोव्यानंतर उत्तराखंडचा क्रमांक लागतो. उत्तराखंडच्या 1 टक्के (50, 408) मतदारांनी नोटाला पसंती दिली.

उत्तर प्रदेश, जिथे भाजपने मुसंडी मारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली, तिथेही 0.9 (7,56,209) टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. पंजाबमध्ये 0.7 टक्के (1,08,157), तर मणिपूरमध्ये 0.5 (8,563) टक्के मतदारांनी नोटाला मत दिलं.

गोव्याच्या 40, उत्तराखंडच्या 70, मणिपूर 60, पंजाब 117 आणि उत्तर प्रदेशच्या 403 विधानसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया विविध टप्प्यात पार पडली. त्याचा निकाल आज (शनिवार) जाहीर झाला.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये मोदी लाट दिसली. याच मोदी लाटेवर सवार होत भाजपने 300 पेक्षा अधिक जागा मिळवत बहुमताने विजय मिळवला.

उत्तर प्रदेशात एवढ्या जागांवर विजय मिळवणारा भाजप पहिलाच पक्ष ठरला आहे. 1980 साली काँग्रेसने 309 जागा मिळवल्या होत्या. यापर्वी भाजपने 1991 साली मोठा विजय मिळवला होता. 1991 साली भाजपनं 221, काँग्रेसनं 46, जनता दलनं 92, जनता पार्टीनं 34 आणि बसपनं 12 जागा मिळवल्या होत्या.

संबंधित बातम्या :

पदार्पणातच मुलायम यांच्या सूनबाई अपर्णा यादव पराभूत


EVM घोटाळा करुन भाजपचा विजय, निकाल रद्द करुन फेरमतदान घ्या : मायावती


लता मंगेशकर-आशा भोसलेंकडून भाजपचं अभिनंदन


5 पैकी 2 मुख्यमंत्री हरले, गोवा आणि उत्तराखंडच्या CM चा पराभव


Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?