देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...



महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात 18 जुलैला सुनावणी


राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात 18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तब्बल दोन महिन्यानंतर या सुनावणीसाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. 10 एप्रिलनंतर आता 18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होईल. राज्यात प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांचे भवितव्य निश्चित करणारी ही सुनावणी आहे. वाचा सविस्तर


मिशन 2024 विरोधकांचं स्पेशल 26, बंगळुरुमधील बैठकीसाठी काँग्रेसकडून आणखी दोन पक्षांना निमंत्रण


2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडीची स्थापना करण्याच्या दृष्टीने देशातील विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. याच प्रक्रियेचा भाग म्हणून विरोधकांची पुढील बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बंगळुरुमध्ये होणार आहे. विरोधकांची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने काँग्रेसने आणखी दोन लहान पक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अपना दल (कमेरावादी) आणि तामिळनाडूतील एक प्रादेशिक पक्षालाही बंगळुरुमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे. वाचा सविस्तर


राष्ट्रवादीतील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या भेटीला


राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. अजित पवार 18 जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. याबाबत खुद्द अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले, ''मी 18 जुलैला पंतप्रधान मोदींना भेटणार आहे.'' या बैठकीत मी त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडणार आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार पहिल्यांदाच मोदींची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाचा सविस्तर


खालिस्तान समर्थकांना भारत सरकार चोख उत्तर देणार? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं सूचक वक्तव्य


भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकरयांनी खलिस्तानच्या मुद्द्यावर भाष्य करत कॅनडावर निशाणा साधला आहे. कॅनडामध्ये हिंसा भडकावणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, असं वक्तव्य जयशंकर यांनी केलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जकार्ता येथे आसियान प्रादेशिक मंचाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी खलिस्तानच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. जयशंकर यांनी कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मिलानी जॉली यांची भेट घेऊन खलिस्तानचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. वाचा सविस्तर


उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम, हिमाचल प्रदेशचं 8000 कोटींचं नुकसान 


सध्या उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांना नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. रस्ते बंद झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वाचा सविस्तर 


लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी LOC ला लागून असलेल्या भागाला दिली भेट; सैनिकांचं मनोधैर्यही वाढवलं


जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आलेले लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शनिवारी (15 जुलै) नियंत्रण रेषेजवळील पुढच्या भागांना ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. त्यांनी सीमेवर सुरु असलेल्या ऑपरेशनची तयारी आणि इतर गोष्टींची माहिती घेतली. तसेच त्यांनी नियंत्रण रेषेवर जागरुकता ठेवण्यासाठी घुसखोरीविरोधी ग्रिड अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. वाचा सविस्तर


स्थानिक चलनात व्यवहार ते अबुधाबीत IIT कॅम्पस...पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात UAE बरोबर 'हे' करार झाले


पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीला भेट देऊन शनिवारी (15 जुलै) मायदेशी परतले. फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान शनिवारी एक दिवसीय दौऱ्यासाठी यूएईला पोहोचले. या ठिकाणी पंतप्रधानांनी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली.भारत आणि UAE यांनी आपापल्या चलनात व्यावसायिक व्यवहार सुरू करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. तसंच अबुधाबीमध्ये आयआयटी दिल्लीचे कॅम्पस स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले. वाचा सविस्तर


मानवाचं चंद्रावर पहिलं पाऊल, भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म; आज इतिहासात


इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आजच्या दिवसाचे ही महत्त्व आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि समाजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी चंद्रावर पहिलं मानवी पाऊल पडलं होतं. तर महान हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म आज झाला. हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफचा जन्म देखील आजच्या दिवशी झाला. वाचा सविस्तर


मेष, सिंह, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. कन्या राशीचे लोक जे घरापासून दूर नोकरी करत आहेत त्यांच्या कुटुंबियांना भेटायला येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कसा असेल रविवारचा दिवस मेष ते मीन, काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर