देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मांडणार, चर्चा होणार की गोंधळात मिळणार मंजुरी? 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज राज्यसभेत (Rajya Sabha) दिल्ली सेवा विधेयक सादर करणार आहेत. यासाठी विरोधी पक्षाने तयारी केली असून रविवारी आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसने (Congress)  खासदारांना व्हिप जारी केला आहे.   अविश्वास प्रस्ताव आणि दिल्ली सेवा विधेयकामुळे पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे.  (वाचा सविस्तर)


बिजगर्णीमध्ये शेतात काम करत असताना विद्युत तार अंगावर पडली, दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू 


बेळगाव (Belgaon) जवळील बिजगर्णी इथे हेस्कॉमच्या (Hescom) हलगर्जीपणामुळे तरुण शेतकरी दाम्पत्याचा (Couple) मृत्यू झाला. रविवारी (6 ऑगस्ट) शेतात रताळ्यावर औषध फवारणी करत असताना निसार सनदी यांच्यावर विजेची तार (Electric Wire) पडली. यावेळी त्यांना वाचवायला गेलेल्या त्यांची पत्नीलाही (Wife) विजेचा धक्का बसला. या घटनेत दोघांचाही शेतात मृत्यू झाला (वाचा सविस्तर)


 ज्ञानव्यापीचं 3D मॅपिंग, मशिदीच्या तळघरात मंदिर शैलीतील 20 कपाटं; मुस्लिम पक्षाकडून सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा


वाराणसीमधील (Varanasi) ज्ञानव्यापी मशिद (Gyanvapi Masjid) परिसरात सध्या पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होतं. ज्ञानव्यापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) तळघराचा सर्व्हे करण्यात येत आहे. ज्ञानव्यापी मशिदीमध्ये मंदिर शैलीतील 20 कपाटं सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. 
 (वाचा सविस्तर)


अखेर चंद्राचं दर्शन झालं! चांद्रयान- 3 यानाने पाठवला पहिला फोटो 


भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला आहे. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने (Chandrayaan-3) शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रं (Chandrayaan 3 Moon Photo) घेतली आहेत.  (वाचा सविस्तर)


राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व आज बहाल होण्याची शक्यता, काँग्रेसनं सर्व कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडे सोपवली 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसबा सचिवालय सोमवारी पडताळून पाहणार आहे. त्यानुसार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे राहुल गांधींच्या खासदारकीची चावी ओम बिर्ला यांच्या हाती असणार आहे.  (वाचा सविस्तर)


आसाममधील बहुपत्नीत्व प्रथा लवकरच संपुष्टात येणार, सरकार लवकरच कायदा करणार


आसाममधील बहुपत्नीत्व प्रथा संपवण्यासाठी सरकार पाऊलं उचलत आहे. आसाममध्ये बहुपत्नीत्व संपवण्यासाठी सरकार कायदा करणार आहे. बहुपत्नीत्वाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने रविवारी आपला अहवाल मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याकडे सादर केला आहे.  (वाचा सविस्तर)


नोबल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय रविंद्रनाथ टागोर यांची पुण्यातिथी; इतिहासात आज


आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आजच्याच दिवशी मुंबई महानगर पालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती. तसेच श्रीहरिकोटा येथून पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. (वाचा सविस्तर)


आजपासून सुरु होणारा आठवडा 'या' राशींसाठी चांगल्या संधी घेऊन येणार! वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य


आजपासून ऑगस्ट महिन्यातला दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मेष, मिथुन, वृश्चिक राशींसाठी चांगला जाणर आहे. तर, कर्क, कन्या, तूळ आणि धनु राशीसाठी नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात. (वाचा सविस्तर)