देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


येत्या 36 तासात बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होणार, महाराष्ट्रासह चार राज्यांना सतर्कतेचा इशारा 


बिपरजॉय' चक्रीवादळाचा (yclone Biparjoy) भारतात प्रभाव दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळं चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (वाचा सविस्तर) 


चीनच्या शाओमी टेक्नॉलॉजी कंपनीला ईडीकडून कारणे दाखवा नोटीस


ईडीच्या (ED) निर्णायक प्राधिकरणाने शाओमी टेक्नॉलॉजी (Xiaomi Technology) या चीनच्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शाओमी कंपनीचे अधिकारी आणि तीन मोठ्या बँकांनाही ईडीकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. शाओमी कंपनीवर ईडीने फेमा अंतर्गत कारवाई करत याआधी तब्बल 5 हजार 551 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (वाचा सविस्तर)


बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत हिंसाचार; काँग्रेस खासदाराचे राज्यपालांना पत्र, निवडणुकीसाठी केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी 


 पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान  झालेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद उमटत आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांना पत्र लिहून निवडणुकीसाठी सैन्य तैनात करण्याची मागणी केली आहे. काल पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. (वाचा सविस्तर)


 डोनाल्ड ट्रम्प गुन्हेगारी खटला दाखल होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष,  व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप


मेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. गोपनीय कागदपत्रांशी  लीक केल्याचे आरोप ट्रम्प यांच्यावर आहेत . या प्रकरणी त्यांच्यावर कारवई होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात शेकडो गोपनीय कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे.  तपास यंत्रणांनी ट्रम्प यांच्यावर या प्रकरणांमध्ये आरोप निश्चित केले आहेत. (वाचा सविस्तर)


लॉर्ड्सच्या मैदानावर भारताचा पहिला कसोटी विजय, इस्त्रायलने अरबांचा युद्धात दारुण पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना; आज इतिहासात 


 भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 10 जूनला ऐतिहासिक असं महत्त्व आहे. हा तोच दिवस आहे जेव्हा भारतीय संघाने पहिल्यांदा लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना जिंकला होता. 10 जून 1986 रोजी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा आज स्थापना दिवस आहे.  (वाचा सविस्तर) 


Horoscope Today 10 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य


आज शनिवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. कर्क, धनु राशीच्या लोकांनी आज काळजी घ्यावी. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तर, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी शनिवार कसा राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)


 जिवंत मासा घशात सोडून दमा बरा होणार... तीन वर्षांच्या खंडानंतर दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'ला हैदराबादमध्ये सुरुवात  


 दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या 'फिश प्रसादम' (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला आजपासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी मृग नक्षत्र (Mrigasira Karti) सुरू झाल्यानंतर दोन दिवस या माशाच्या तोंडाला लावण्यात आलेल्या औषधाचं वाटप करण्यात येतं. जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेलं औषध लावण्यात येतं आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो. (वाचा सविस्तर)