देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! राज्यात 'या' जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाऊस बरसणार


Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हवामान बदल (Weather Update) झालेला दिसत आहे. राज्यासह देशात (India) एकीकडे हवेतील गारवा वाढलेला (Cold Weather) जाणवत आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र (Maharashtra) सह काही देशात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम राज्यासह देशातील हवामानावर होत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील काही भागात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  वाचा सविस्तर...


भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारणार; जम्मू काश्मिरमध्ये पुतळ्याचं आज अनावरण


Statue of Chhatrapati Shivaji Maharaj on India Pakistan Border : भारताचा (India) कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) आता कापरं भरणार आहे. तसेच, भारताविरोधात कुरघोड्या करण्यापूर्वी पाकिस्तानला आता एकदा नाहीतर 10 वेळा विचार करावा लागणार आहे. कारण जम्मू काश्मिरमधील (Jammu & Kashmir) कुपवाड्यात (Kupwara) छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. याच पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी जम्मू-काश्मिरमधील कुपवाड्यात दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर...


Israel Hamas War : इस्रायल-हमास संघर्षाचा एक महिना! युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू


Israel Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत या युद्धाला सुरुवात केली, त्यानंतर हमासचा खात्मा करण्याासाठी इस्रायलही युद्धात उतरलं. गेल्या महिन्याभरापासून हा संघर्ष सुरुच असून युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. इस्रायल आणि हमास युद्धात 10000 हजारहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. वाचा सविस्तर...


7 November In History : स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म, केशवसुत आणि पंडित पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन; आज इतिहासात


मुंबई : आजच्याच दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी भारतीय क्रांतिकारी बिपिनचंद्र पाल यांचा झाला होता. शिक्षणशास्त्र, मानस आणि बालमानस  या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म झाला होता. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन झाले. शास्त्रीय गायक, संगीतकार आणि  शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन झाले होते. वाचा सविस्तर...


Horoscope Today 7 November 2023 : आजचा मंगळवार खास! मेष ते मीन राशीचे आजचे राशीभविष्य, जाणून घ्या


Horoscope Today 7 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 7 नोव्हेंबर 2023 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज आपले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या प्रेमजीवनासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या जीवनसाथीसोबत खूप मोकळा वेळ घालवतील सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...


Numerology Today 7 November 2023 : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी आज शुभसंकेत; अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य


Numerology Today 7 November 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.  वाचा सविस्तर...