देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा फैसला होणार! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष


Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं (Maharashtra Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पीटिशनवर (Curative Petition) आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. वाचा सविस्तर 


Weather Update : चक्रीवादळामुळे पावसानं झोडपलं! पुढील 48 तास हवामान कायम राहण्याचा अंदाज, 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता


Heavy Rain Updates : दक्षिण बंगालच्या उपसागरावरील खोल दाबामुळे तयार झालेलं तीव्र चक्रीवादळ 'मिचॉन्ग' (Cyclone Michaung) आंध्र प्रदेशामध्ये (Andhra Pradesh) धडकलं आहे. दक्षिणेकडील किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या लँडफॉलनंतर आजूबाजूच्या भागात तुफानी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडील ओडिशामध्ये वादळाचा परिणाम दिसून येत असून येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवस हवामान कायम राहणार असून जास्त बदल होण्याची शक्यता नाही. वाचा सविस्तर 


दाखवलं फेल ट्रान्जॅक्शन, पण पैसे झाले ट्रान्सफर, बँकेचे दोन इंजिनिअर मास्टरमाइंड; 820 कोटींच्या अफरातफरीचा CBI कडून भंडाफोड


UCO Bank Fraud Case: केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) युको बँकेतील (UCO Bank) 820 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा (Fraud) पर्दाफाश केला आहे. 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या फसवणुकीचे सूत्रधार दोन इंजिनिअर असल्याचंही तपासात समोर आलं आहे. खासगी बँकांच्या 14 हजार खात्यांमधून या दोन पठ्ठ्यांनी युको बँकेच्या 41 हजार बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले होते. या फसवणुकीसाठी 8.53 लाख IMPS ट्रान्सफर करण्यात आले होते. यानंतर बँकेनं तत्काळ कारवाई करत IMPS सेवेवर बंदी घातली. याप्रकरणी सीबीआयनं मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर 


Sim Card Rules: नवं सिम घेण्यासाठी कागदपत्रांचे झेरॉक्स नाही, डिजिटल KYC अनिर्वाय; नव्या वर्षापासून मोठा बदल


Mobile Connection Rules: दूरसंचार मंत्रालयानं (Ministry of Telecom) 1 जानेवारी 2024 पासून नव्या मोबाईल कनेक्शन (New Mobile Connection) खरेदीचे नियम बदलले आहेत. यामुळे आता ग्राहकांना नवं सिमकार्ड (New SIM Card) घेणं सोपं झालं आहे. देशात डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी, दूरसंचार विभागानं (Telecom Ministry) माहिती दिली आहे की, आता नवं सिम कार्ड (SIM Card) मिळविण्यासाठी पेपर बेस्ड केवाईसी (Paper Based KYC) वर पूर्ण बंदी असेल. त्यामुळे आता नवं सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना फक्त डिजिटल किंवा ई-केवायसी (e-KYC) सबमिट करावं लागणार आहे. वाचा सविस्तर  


Post Office FD Rules: पोस्ट ऑफिस FD स्किममधून प्रिमॅच्युअर विड्रॉलचे नियम बदलले; नवे नियम काय?


Post Office Fixed Deposit Rules: सर्वात सुरक्षीत आणि आकर्षक परतावा देणाऱ्या योजनामुळे अनेक गुंतवणूकदार (Investors) पोस्ट ऑफिसच्या योजनांना (Post Office Schemes) पसंती देतात. पोस्टाच्या लोकप्रिय योजनांपैकी एक योजना म्हणजे, पोस्ट ऑफिस एफडी योजना (Post Office FD Scheme) किंवा टाईम डिपॉझिट स्किम (Time Deposit Scheme). अलीकडेच अर्थ मंत्रालयानं (Ministry of Economy) पोस्ट ऑफिसच्या (Post Office) एफडी योजनेत मोठे बदल केले आहेत. वाचा सविस्तर 


"तुम्हाला मला टी-20 वर्ल्डकपमध्ये घ्यायचं असेल तर..." रोहित शर्माचा स्पष्ट प्रश्न, BCCI अधिकाऱ्यांनीही सांगितली 'मन की बात'!


Rohit Sharma To BCCI Officials: काही दिवसांपूर्वीच वर्ल्डकप 2023 स्पर्धेची (ICC World Cup 2023) सांगता झाली. यंदा वर्ल्डकपचं (World Cup 2023) यजमानपद भारताकडे (India) होतं. अशातच संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियानं (Team India) धुवांधार कामगिरी केली. एकही सामना न गमावता टीम इंडियानं फायनल गाठली खरी, मात्र फायनलमध्येच प्रतिस्पर्धी कांगारूंनी टीम इंडियावर मोठ्या शिताफिनं मात केली. टीम इंडियाच्या हातचा घास हिरावत ऑस्ट्रेलियानं (Australia) वर्ल्डकप 2023 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. वर्ल्डकप 2023 मधील टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. वाचा सविस्तर 


6th December In History : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन, बाबरी मशीद विध्वंस; आज इतिहासात...


6th December In History :  इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते. इतिहासात घडलेल्या घडामोडींचा भविष्यावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या काही दिवशी झालेल्या घडामोडी इतिहासात जागा मिळवतात. आजचा दिवसही तसाच काहीसा आहे. प्रथमत: आणि अंतिमत: भारतीय असल्याचे सांगणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. तर, स्वातंत्र्य चळवळीत पत्री सरकार चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नाना सिंह पाटील (Nana Patil) यांचा स्मृतीदिन आहे. आजच्या दिवशी कारसेवकांनी बाबरी मशीद उद्धवस्त (Babri Masjid Demolition) केली. त्यानंतर देशभरात मोठी जातीय दंगल उसळली होती. वाचा सविस्तर 


Horoscope Today 6 December 2023 : आजचा बुधवार खास! वृषभ, कन्या, मकर, कुंभ राशीचे लोक भाग्यवान ठरू शकतात, आजचे राशीभविष्य पाहा


Horoscope Today 6 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 6 डिसेंबर 2023 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांनी आज आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहावे. आज कन्या राशीच्या लोकांनाही मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या, वाचा सविस्तर