देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update : अवकाळी पावसामुळे गारठा वाढला! आजही पावसाची शक्यता कायम; IMD चा अंदाज काय सांगतो?
Unseasonal Rain Alert : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह विजांचा गडगडाट पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आजही देशात अनेक भागात पावसाची शक्यता कायम आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात मात्र, घट झाली आहे. पावसामुळे हवेत गारठा वाढला आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने त्याचाही हवामानावर परिणाम होत असून पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाचा सविस्तर...
Indian Navy : नौदलात दाखल होणार 'रोमियो'! भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार
Indian Navy : भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय नौदलात नवा योद्धा सामील होणार आहे. भारतीय नौदलात MH-60R सी हॉक हेलिकॉप्टर (MH-60 Romeo Helicopter) दाखल होणार आहे. भारतीय नौदलासाठी बुधवार हा मोठा दिवस आहे. 6 मार्च रोजी MH-60 Romeo हेलिकॉप्टर नौदलात सामील करण्यात येतील. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून MH60R Seahawk हेलिकॉप्टरचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, मुंबईंत मुक्काम; महायुतीच्या जागावाटपावर होणार चर्चा
Amit Shah Visit Maharashtra : भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून, सोमवारी रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) दाखल झाले आहेत. राजकीयदृष्ट्या अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात असून, त्यांच्या याच दौऱ्यात महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपावर चर्चा होणार आहे. अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यावर शाह हे मुंबईला (Mumbai) मुक्काम करणार आहेत. त्यामुळे मुंबईत आज महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...
Baramati Lok Sabha Constituency : युगेंद्र पवार काकाची साथ सोडून आत्याच्या प्रचारासाठी मैदानात; बारामतीचं राजकारण तापलं
Baramati Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. अशात अजित पवारांचे (Ajit Pawar) सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे युगेंद्र पवारांनी काकांची साथ सोडून आता आत्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी आज युगेंद्र पवार बारामती तालुक्यात गावभेट दौरा करणार आहेत. वाचा सविस्तर...
Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!
Tanush Kotian Profile : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात मुंबईनं रणजी चषकाच्या (Mumbai ranji trophy) अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईनं रेकॉर्डब्रेक 48 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईनं तामिळनाडूचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं. मुंबईला अंतिम फेरीत पोहचवण्यात युवा खेळाडूचं मोठं योगदान राहिलाय. होय, युवा तनुश कोटियन (Tanush Kotian) यानं अष्टपैलू कामगिरी करत मुंबईला अंतिम फेरीत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचललाय. वाचा सविस्तर...
Horoscope Today 5 March 2024 : आजचा मंगळवार खास! बजरंगबलीची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य
Horoscope Today 5 March 2024 : पंचांगानुसार, आज 5 मार्च 2024, मंगळवारचा दिवस सर्व राशींच्या दृष्टिकोनातून चांगला असणार आहे. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. ग्रहांच्या स्थितीनुसार, 5 राशीचे लोक या काळात नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...