देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Weather Update : मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज, राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट


Weather Update Today : पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department) अंदाजानुसार, पुढील 24 तासांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यासह देशात काही भागात वीकेंडला पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं आहे. शनिवारी अनेक भागात पाऊस झाला असून आज रविवारीही पावसाचा अंदाज कायम आहे. वाचा सविस्तर...


BJP Candidates List 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत मोदी सरकारमधील दिग्गज मंत्र्यांना वगळलं, पाहा संपूर्ण यादी


Lok Sabha Elections BJP Candidates : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची (BJP Candidates) पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून (BJP) जारी करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये 195 उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने केंद्रीय मंत्र्यांवर विश्वास कायम ठेवल्याचं दिसत आहे. या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहेत. दरम्यान भाजपने पहिल्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याशिवाय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही तिकीट दिलेलं नाही. वाचा सविस्तर...


BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान 34 खासदारांना घरचा रस्ता; आयारामला अवघ्या 24 तासात पायघड्या!


BJP Candidates List : भाजपने शनिवारी (2 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)195 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 34 विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. त्यांच्या जागी नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपमध्ये अवघ्या 24 तासांपूर्वी दाखल झालेल्या तेलंगणातील बी. बी. पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. कुठे किती उमेदवार बदलले आणि त्यांच्या जागी कोणाला तिकीट मिळाले हे वाचा सविस्तर...


Rahul Gandhi : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, ठाण्यात धडकणार भारत जोडो न्याय यात्रा


Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे (Thane) जिल्ह्यात धडकणार आहेत. दि. 15 आणि 16 मार्चला राहुल गांधी ठाण्यात येतील. यावेळी त्यांची सभादेखील आयोजित करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...


Bengaluru Blast : आधी इडली ऑर्डर, मग घडवला 'स्फोट, 56 मिनिटांचा कट! बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपीचा शोध सुरू


Bengaluru Blast : नाव- अज्ञात, वय- 28-30 वर्षे, पत्ता- अज्ञात, आरोप- रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट. बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwar Cafe Blast) झालेल्या स्फोटातील तो मुख्य आरोपी आहे. याच व्यक्तीने कॅफेमध्ये स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. डोक्यावर टोपी, तोंडावर मास्क, डोळ्यांवर चष्मा, खांद्यावर बॅकपॅक आणि नेहमीपेक्षा वेगाने चालणे. या व्यक्तीचे नाव कोणालाच माहीत नाही, हीच या संशयिताची ओळख आहे. या व्यक्तीने कॅफेच्या वॉश बेसिनमध्ये बॉम्ब ठेवला आणि नंतर तेथून निघून गेला. तिथून निघताच मोठा स्फोट झाला. ज्या पद्धतीने या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आला, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना धक्काच बसला. यात दहशतवादी कारस्थान आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे. वाचा सविस्तर...


Pakistan : अखेर पाकिस्तानात सरकार स्थापन होणार! शाहबाज शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान बनणार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकाही होणार


Pakistan : अखेर पाकिस्तानात सरकार स्थापन होण्याची वेळ आली आहे. निवडणुकीतील हेराफेरीचे आरोप आणि सरकार स्थापनेच्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांदरम्यान, पीएमएल-एन नेते शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) रविवारी पाकिस्तानचे 33 वे पंतप्रधान बनणार आहेत. शाहबाज शरीफ पुन्हा एकदा आघाडी सरकारचे नेतृत्व करू शकतात. पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात युती आहे आणि रविवारी दोघे मिळून सरकार स्थापन करणार आहेत. पाकिस्तानमध्ये आज सरकार स्थापन झाल्यानंतर 9 मार्चपूर्वी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका घेण्याचीही योजना आहे. वाचा सविस्तर...


 


Gajanan Maharaj Prakat Din 2024 : आज गजानन महाराज प्रकट दिन; प्रियजनांना 'हे' संदेश पाठवून द्या खास शुभेच्छा


Gajanan Maharaj Prakat Din 2024 : श्री संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकटदिन आज, रविवारी, 3 मार्चला साजरा केला जात आहे. “श्रीं”चा प्रकट दिन (Gajanan Maharaj Prakat Din 2024) शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश-विदेशात देखील भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शेगावनिवासी संत श्री गजानन महाराजांना श्री दत्तगुरुंचं तिसरं रूप म्हणून ओळखलं जातं. गजानन महाराज प्रकट दिनी तुम्ही आपल्या नातेवाईक आणि मित्रांना खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता. वाचा सविस्तर...