Gajanan Maharaj Prakat Din 2024 : श्री संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकटदिन आज, रविवारी, 3 मार्चला साजरा केला जात आहे. “श्रीं”चा प्रकट दिन (Gajanan Maharaj Prakat Din 2024) शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश-विदेशात देखील भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शेगावनिवासी संत श्री गजानन महाराजांना श्री दत्तगुरुंचं तिसरं रूप म्हणून ओळखलं जातं. गजानन महाराज प्रकट दिनी तुम्ही आपल्या नातेवाईक आणि मित्रांना खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता.


संत गजानन महाराज शुभेच्छा संदेश (Gajanan Maharaj Prakat Din Shubhechha Sandesh)


श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
गण गण गणात बोते !


“शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते”
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


जसे हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसे माझ्या हृदयात श्री गजानन महाराज आहेत
श्री संत गजानन महाराज की जय
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रह्मांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतिपालक ॥
॥ शेगावनिवासी ॥
॥ समर्थ सदगुरू ॥
॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥
!! गण गण गणात बोते !!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!


दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…


फळा आले जन्मोजन्मींचे पुण्य,
लाभले जीवनी गुरु गजानन
जरी कुडी माझी दुजे गावी,
प्राण माझा गुरु चरणी शेगांवी
श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या मंगलमय शुभेच्छा


जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 
कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
॥ गण गण गणात बोते ॥


रक्षक तूंचि भक्तजनां
निर्गुण तूं परमात्मा तू
सगुण रूपात गजानन तू
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नित्य असावी ध्यानीमनी,
बावन्न गुरुवारा नम..
करा पाठ बहु भक्तीने,
विघ्ने सारी पळती दूर..
जय गजानन श्री गजानन


करतो मी स्पष्ट।
नाही मी गर्विष्ठ।।
फक्त झुकतो गजानापुढे।
तेच माझ्यासाठी श्रेष्ठ।।


श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या मंगलमयी शुभेच्छा


हेही वाचा:


Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला बनले दुर्मिळ योग; महादेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचे लोक होणार समृद्ध; कमावणार बक्कळ पैसा