देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Jalna-Mumbai Vande Bharat Train: जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे, महाराष्ट्रातील सातवी अन् मुंबईला जोडणारी पाचवी वंदे भारत; मोदींच्या हस्ते आज उद्घाटन


Ayodhya PM Modi Visit, Jalna-Mumbai Vande Bharat Train Time Table: उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज अयोध्येत (Ayodhya) पंतप्रधान मोदी (PM Modi) पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं (Ayodhya Railway Station) उद्घाटन करतील. एक नाही, दोन नाही तर तब्बल 6 वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) गाड्यांना पंतप्रधान मोदी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये जालान-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा (Jalna-Mumbai Vande Bharat Express) समावेश आहे. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातून मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे, हे मात्र नक्की... वाचा सविस्तर 


EXCLUSIVE: मविआतील जागावाटपावर काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला?एक्स्क्लुझिव्ह माहिती 'ABP माझा'च्या हाती


Maharashtra Politics: नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटातून एक महत्त्वाची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काँग्रेसचा (Congress) फॉर्म्युला ठरला आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चेत आहे. अशातच 'एबीपी माझा'च्या हाती याचसंदर्भात एक्स्क्लुझिव्ह (ABP Majha Exclusive) माहिती लागली आहे... वाचा सविस्तर 


Maharashtra Weather : पुढील 48 तास पावसाची शक्यता, थर्टी फर्स्टला पावसाची हजेरी; हवामान खात्याने काय म्हटलं?


Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रात सध्या गारठा वाढला असून आता हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगर, ठाणे (Thane), कोकण आणि विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. देशाच्या उत्तरेकडे तापमानात घट (Cold Wave) झाल्याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावरही दिसून येत आहे. सध्या राज्यातील थंडी कमी झाली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. परिणामी किमात तापमानात किंचित वाढ झाली आहे. मात्र, गारठा कायम आहे. नागरिक शेकोटी आणि गरम कपड्यांच्या आधार घेताना दिसत आहेत. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाच्या शेवटी नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे... वाचा सविस्तर 


Weather Update : पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता, IMD ने वर्तवला अंदाज


Weather Update Today : देशात सध्या थंडीत (Winter) पावसाळा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळत आहे, तर दक्षिण भारतात पावसाची रिमझिम सुरु आहे. याशिवाय पर्वतीय भागात पावसासह बर्फवृष्टी पाहायला मिळत आहेत. बर्फवृष्टीमुळे पर्यटक काश्मीर खोऱ्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचले आहेत .दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानावर परिणाम होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे... वाचा सविस्तर 


30 December In History: मुस्लिम लीगची स्थापना, विक्रम साराभाई यांचं निधन; आज इतिहासात


मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. 30 डिसेंबर 1906 रोजी ऑल इंडिया मुस्लिम लीगची (All-India Muslim League) स्थापना झाली होती. बांगलादेश स्वातंत्र्य झाल्यानंतर याचं नाव मुस्लीम लीग असं झालं. आजच्याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे तिरंगा फडकावला होता. (first time tricolour hoist by subhash chandra bose in port blair took control of land ) त्याशिवाय  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. विक्रम साराभाई (Vikram Sarabhai Indian physicist) यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. त्याशिवाय इतिहासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.... वाचा सविस्तर 


New Year Resolution : नवीन वर्षाचा संकल्प करताय? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा, नाहीतर होईल नुकसान


New Year 2024 Resolution : नवीन वर्षात (New Year 2024) स्वतःला सुधारण्यासाठी दरवर्षी आपण काही ना काही संकल्प (New Year Resolution) करतो. आपल्यात सुधारणा करण्यासाठी आणि वेळ सत्कारणी लावण्यासाठी आपण नव्या वर्षात संकल्प (New Year Goals) करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि यातूनच प्रेरणा घेणून आपण मेहनत करतो. पण, अनेक वेळा आपण आपल्यासमोर असे संकल्प करतो ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास करावा लागतो. आपण संकल्प (New Year 2024 Resolution) करतो, पण नंतर ते पूर्ण झाले नाही की आपलं मानसिक खच्चीकरण होऊन मानसिक समस्या सतावण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन वर्षात असे संकल्प घेणं टाळावं. नववर्षाचा संकल्प करताना (New Year 2024 Goals) कोणत्या गोष्टींचा समावेश करू नये हे जाणून घ्या... वाचा सविस्तर


Sankashti Chaturthi 2023 : आज 2023 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! बाप्पाला करा प्रसन्न; चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व जाणून घ्या 


Sankashti Chaturthi 2023 : वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी व्रत 30 डिसेंबर रोजी म्हणजेच आज करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी होणारी ही संकष्टी चतुर्थी असेल. जीवनातील अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी आज व्रत, पूजा करतो, त्याला आयुष्यात कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही. चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना केल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते. जाणून घेऊया बाप्पाची पूजा कशी करायची? संकष्टी चतुर्थीची तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या. संकष्टी चतुर्थीची तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या... वाचा सविस्तर 


Horoscope Today 30 December 2023 : आज 2023 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! 12 राशींसाठी शनिवार कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 30 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 30 डिसेंबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीच्या लोकांना खऱ्या समर्पणाने आणि मेहनतीने आज नक्कीच यश मिळेल. आज तूळ राशीचे लोक करिअर घडवण्यात यशस्वी होतील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर