देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update : महाराष्ट्रासह 'या' भागात पावसाची शक्यता, थर्टी फर्स्ट सेलिब्रिशनला वरुणराजाची हजेरी; IMD ची माहिती
Weather Update Today : देशाच्या हवामानात चांगलाच बदल झालेला दिसून येत आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळी दाट धुक्यासह थंडी पाहायला मिळत आहे, तर दुपारी उन्हाची झळ बसत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, दक्षिण भारतात पावसाची रिमझिम पाहायला मिळत असताना काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. महाराष्ट्रासह देशात काही भागात डिसेंबरअखेर आणि नववर्षाच्या सुरुवातीली पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. वाचा सविस्तर...
Maharashtra Weather : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी! पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसं असेल?
Maharashtra Weather Update Today : राज्यात थंडी (Winter) आणि धुक्यासह (Fogg) पावसाची रिमझिमही ( Rain Update ) पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यातील (Maharashtra) तापमानात (Temperature Drops) कमालीची घट झाली आहे. सकाळी आणि रात्री थंडी (Cold Weather) तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगर, ठाणे (Thane) आणि कोकणातही (Kokan) तापमानाचा पारा घसरला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील तापमानात आणखी बदल होऊन पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. वाचा सविस्तर...
काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात "हैं तैयार हम" महारॅली, लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकणार
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) बिगुल फुंकण्यासाठी दीक्षाभूमी व संघभूमी असलेल्या उपराजधानीत गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहे. काँग्रेस (Congress) स्थापना दिनानिमित्त 'है तयार हम' सभेचं आयोजन करण्यात आले आहे. सोनिया गांधी(Soniya Gandhi) , राहुल गांधी (Rahul Gandhi) , प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) उपस्थित राहाणार आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने 28 डिसेंबर ला नागपुरात काँग्रेसची 'है तयार हम' अशी महारॅली (सभा) होणार आहे. त्यासाठी उमरेड रोडवरील बहादुरा परिसरात 40 एकर क्षेत्रावर विशेष मैदान तयार करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
Bigg Boss 17 : मुनव्वर फारुकीने आयशा खानला नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले,"भाऊ मास्टरमाइंड"
Bigg Boss 17 Munawar Faruqui Propose Ayesha Khan : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण सध्या या कार्यक्रम एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. 'बिग बॉस 17'च्या घरात मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) आयशा खानला (Ayesha Khan) प्रपोज केलं आहे. वाचा सविस्तर...
28th December In History : राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, उद्योगपती रतन टाटा, धीरुभाई अंबानी यांचा जन्म; आज इतिहासात
28th December In History : इतिहासात प्रत्येक दिवशी काही ना काही महत्वाचं घडलेलं असतं. 28 डिसेंबरचा दिवस देखील देशाच्या आणि जगाच्या इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1875 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (Indian National Congress) स्थापना झाली. 'टाटा सन्स'चे माजी अध्यक्ष आणि उद्योजक रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. त्याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा जन्मदिन आहे. आज इतिहासात वाचा सविस्तर...
Horoscope Today 28 December 2023 : आजचा गुरुवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 28 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 28 डिसेंबर 2023 रोजी गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या हवामानातील बदलासोबत स्वतःमध्ये बदल घडवून आणावेत. कन्या राशीच्या लोकांना आज आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण व्यावसायिकांचा व्यवसाय त्यांच्या बोलण्यावर अवलंबून असतो. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...