देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Madhya Pradesh : उज्जैनच्या महाकाल मंदिरात अग्नितांडव; भस्म आरतीदरम्यान भीषण आग, पुजाऱ्यांसह 13 जण होरपळले
Madhya Pradesh : मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन (Ujjain) येथील महाकाल मंदिरात (Mahakal Temple) मोठं अग्नितांडव (Ujjain Fire Updates) घडलं आहे. महाकाल मंदिरातील भस्मा आरतीदरम्यान मंदिरातील गाभाऱ्यातच भीषण आग लागली. आगीत पुजारी होरपळून गंभीररित्या जखमी झाले आहेत. होळीमध्ये गुलाल टाकल्यानं आग भडकली आणि संपूर्ण गर्भगृहात पसरली. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; संपूर्ण कुटुंब होरपळलं, चार चिमुकल्यांनी जीव गमावला
Mobile Blast And Four Kids Died: नवी दिल्ली : आपल्याला मोबाईल (Mobile) संभाळून वापरण्याचा सल्ला थोरामोठ्यांकडून सर्रास दिला जातो. यामागील हेतू तो हरवेल म्हणून नाहीतर, हातातल्या मोबाईलमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, असा असतो. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) झाल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) होळीच्या पूर्वसंध्येला घडलेली घटना तुम्हा सर्वांचाच थरकाप उडवेल. मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एक दुर्घटना घडली. या घटनेत एक, दोन नाहीतर तब्बल 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी चार मुलांचा मृत्यू झाला असून पालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. वाचा सविस्तर
Weather Update : होळीमध्ये पावसाचा रंग, या भागात पावसाची शक्यता
Weather Update Today : आज देशात सर्वत्र होळीची (Holi) धामधूम पाहायला मिळत आहे. एकीकडे रंगाची उधळण पाहायला मिळत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी रात्री होलिका दहनावेळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर
J P Nadda : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार (Fortuner Car) चोरीला गेली आहे. कारची सर्विसिंग करण्यासाठी चालक दिल्लीतील गोविंदपुरी येथे गाडी घेऊन गेला होता. दरम्यान, 19 मार्च रोजी सर्व्हिस सेंटरमधूनच कार चोरीला गेली. त्यामुळे चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून कारचा शोध घेतला जात आहे. थेट नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
30 चेंडूत 43 धावांची होती गरज; मुंबईचा पराभव कसा झाला?, पाहा अंतिम 5 षटकांमधील थरार
MI Vs GT: IPL 2024: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला. गुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या (MI) फलंदाजांनी हाराकिरी केली. गुजरातने (GT) दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 162 धावांपर्यंत मजल मारली. वाचा सविस्तर
Malavya Rajyog 2024: 31 मार्चला धनाचा दाता शुक्र बनवत आहे शक्तिशाली मालव्य योग, 'या' तीन राशींना मिळणार बक्कळ पैसा
Malavya Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल आणि राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. असाच एक शुभ राजयोग हा मालव्य योग आहे. हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो.या योगाच्या निर्मितीमुळे लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी येते. या आठवड्यात म्हणजे 31 मार्च रोजी असाच एक राजयोग जुळून येत आहे. धन, भौतिक सुख आणि ऐश्वर्य यांचा दाता असलेला शुक्र ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या मीन राशीत प्रवेशामुळे मालव्य राजयोग तयार होईल. हा राजयोग तीन राशींसाठी खूप फायदेशीर मानला असून तीन राशीवर सुखवर्षाव होणार आहे. जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत. वाचा सविस्तर