देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Arvind Kejriwal Net Worth: 100 कोटींचं प्रकरण, ED कडून अरविंद केजरीवालांना अटक; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?


ED Action On Delhi CM Arvind Kejriwal: नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam Case) ईडीकडून (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal Arrest) यांना गुरुवारी रात्री ईडीनं (ED) अटक केली. रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाणार आहे. तसंच, आम आदमी पक्षाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीनं नऊ वेळा समन्स बजावलं. मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. वाचा सविस्तर 


Mahayuti Seat Sharing: बैठकांवर बैठका, तिढा कायम; महायुतीच्या जागावाटपाचं भिजत घोंगडं, दिल्ली दरबारी तोडगा निघणार?


Mahayuti Seat Sharing: मुंबई : महायुतीतला जागावाटपाचा तिढा (Mahayuti Seat Sharing News) काही सुटत नाहीये. काल रात्री देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर (Chief Minister Varsha Residence) महायुतीची बैठक झाली. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत तोडगा मात्र निघालाच नाही अशी सूत्रांची माहिती आहे. आज पुन्हा बैठक होणार आहे, आणि उद्या महायुतीचे नेते अमित शाहांची भेट घेण्यासाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय. शाहांसोबतच्या बैठकीतच जागावाटप निश्चित होईल असंही कळतंय. दरम्यान, काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), गिरीश महाजन (Girish Mahajan), सुनील तटकरे (Sunil Tatkare), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) उपस्थित होते. वाचा सविस्तर 


विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव, समज देऊनही सातत्यानं पक्षविरोधी भूमिका, शिस्तभंगाची कारवाई होणार?


Vijay Shivtare vs Ajit Pawar : बारामती : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) घोषणे आधीपासूनच चर्चेत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघाकडे (Baramati Lok Sabha Constituency) आता शिवसेना (Shiv Sena) नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यामुळे विशेष चर्चेत आला आहे. 2019 मध्ये ज्या अजित पवारांनी आव्हान देत विजय शिवतारे यांचा दारूण पराभव केला होता. आता त्याच अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंनी शड्डू ठोकला आहे. विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पण विजय शिवतारेंच्या याच भूमिकेमुळे आता त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता शिवतारेंवर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर 


दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार; 'त्या' संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार, बोर्डाकडून शिक्षकांना सूचना


SSC Board Exam Paper : मुंबई : दहावीच्या (SSC Exams) विज्ञान भाग - 1 विषयाच्या बोर्डाच्या (Maharashtra Board) पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार आहेत. आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोर्डाकडून दखल घेत शिक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. 18 मार्च रोजीच्या दहावी विज्ञान भाग 1 विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 1 मधील 'सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा' या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी व पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. या आशयाचे संदर्भीय पत्र या बोर्डाच्या कार्यालयास प्राप्त झालं आहे. वाचा सविस्तर 


इस्रोचं मोठं यश! 21व्या शतकातील 'पुष्पक' विमानाची यशस्वी चाचणी; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्य


ISRO Pushpak Aircraft Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोला आज मोठं यश मिळालं आहे. खरंतर, इस्रोच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन टेक्नॉलॉजीची चाचणी यशस्वी झाली आहे. इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक आज (शुक्रवारी) सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे. RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने, पुन्हा वापरण्यायोग्य लॉन्च व्हेईकल (RLV) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. वाचा सविस्तर 


Horoscope 22nd March 2024: शुक्रवारी 'या' राशींचे चमकणार भाग्य, कुणाच्या नशिबात दडलंय काय? वाचा 12 राशींचे राशीभविष्य


Horoscope 22nd March 2024: आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज महाशिवरात्री असून ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होत आहे.  आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर