देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
जेवण उरकलं अन् झोपी गेलो, अचानक ट्रेनचा डब्बाच पलटला; नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसमधील प्रवाशानं सांगितला अपघाताचा थरारक अनुभव
Mumbai Police Recruitment: मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार, गृह खात्याचा निर्णय
Mumbai Police Force Contract Recruitment: मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Force Contract Recruitment 2023) करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (Maharashtra State Security Corporation) कंत्राटी पद्धतीनं (Contract Method) जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागानं (Maharashtra State Home Department) हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
IND vs PAK: तुमच्याकडे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं नकली तिकीट तर नाही? सावध व्हा, नाहीतर...
IND vs PAK Match Tickets: संपूर्ण देश ज्याच्याकडे डोळे लावून बसला आहे. तो विश्वचषकातला (ODI World Cup 2023) हायव्होलटेज सामना म्हणजे, टीम इंडिया (Team India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan). शनिवारी 14 ऑक्टोबरला टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) मैदानात उतरणार असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Ahmedabad Narendra Modi Stadium) हा सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या टाईमटेबलची घोषणा होण्यापूर्वीपासूनच चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता होती. अशातच सामन्याची घोषणा झाली आणि तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. तिकीट स्लॉट सुरू होण्यापूर्वीपासूनच चाहत्यांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. अजूनही चाहते तिकीट मिळवण्यासाठी वाटेल ती किंमत चुकवण्यासाठी तयार आहेत. पण आता यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामना पाहण्याची चाहत्यांची इच्छा एवढी दांडगी आहे की, त्यामध्ये ती फसवणुकीलाही बळी पडत आहेत. वाचा सविस्तर
Navratri 2023 : नवरात्रीचे नऊ दिवस 9 रंगाचे कपडे परिधान करा, देवी दुर्गा होईल प्रसन्न! जाणून घ्या महत्त्व
Navratri 2023 : 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात होणार आहे. 9 दिवस दुर्गा मातेची पूजा करताना 9 रंगाचे कपडे घालावेत, यामुळे देवी प्रसन्न होते. अशी धारणा आहे. 9 देवींचे 9 आवडते रंग जाणून घ्या... वाचा सविस्तर
12 October In History: भारताच्या शोधात असलेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला, मुशर्रफांनी शरीफ यांचे सरकार उलथवले, आज इतिहासात
12 October In History : भारताचा शेजारी देश पाकिस्तानच्या (Pakistan) इतिहासात 12 ऑक्टोबर हा दिवस महत्त्वाच्या आहे. 1999 साली आजच्याच दिवशी पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली होती. या रक्तहीन क्रांतीमध्ये श्रीलंकेतून येणाऱ्या मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणे आणि दहशतवाद पसरवल्याचा आरोप नवाझ शरीफ यांच्यावर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. नंतर शरीफ आणि त्यांच्या कुटुंबातील 40 सदस्यांसह सौदी अरेबियाला पाठवण्यात आले. वाचा सविस्तर
Horoscope Today 12 October 2023 : सिंह आणि धनु राशीच्या लोकांना होणार शुभ लाभ! आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 October 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, आज चंद्र सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत जाणार आहे. सिंह आणि धनु राशीच्या लोकांचे भाग्य आज उत्तम राहील. सिंह राशीत चंद्राच्या आगमनामुळे, आज संध्याकाळी शशी आदित्य तयार होईल कारण सूर्य आधीच कन्या राशीत जात आहे. सिंह आणि धनु राशीव्यतिरिक्त इतर कोणत्या राशींना आज चंद्राच्या या संक्रमणाचा फायदा होईल? जाणून घेण्यासाठी आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर