Navratri 2023 : 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात होणार आहे. 9 दिवस दुर्गा मातेची पूजा करताना 9 रंगाचे कपडे घालावेत, यामुळे देवी प्रसन्न होते. अशी धारणा आहे. 9 देवींचे 9 आवडते रंग जाणून घ्या



नवरात्री 2023 प्रतिपदा तिथी (नारंगी)
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनासोबत शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. देवीला केशरी रंग आवडतो. केशरी रंग ऊर्जा आणि आनंदाची भावना देतो. केशरी रंग सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो.



नवरात्री 2023 द्वितीया तिथी (पांढरा)
16 ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीला समर्पित केला जाईल. हा दिवस सोमवार आहे, त्यामुळे पांढरे वस्त्र परिधान केल्याने देवीसोबत भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो. सफेद हे पवित्रता आणि शांतीचे प्रतीक आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.



नवरात्री 2023 तृतीया तिथी (लाल)
17 ऑक्टोबर रोजी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ राहील. लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. लाल रंग शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक आहे.



नवरात्री 2023 चतुर्थी तिथी (गडद निळा) 
18 ऑक्टोबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा करा. असे मानले जाते की, हा रंग आनंदाची भावना देतो. यामुळे समृद्धी वाढते.



नवरात्री 2023 पंचमी तिथी (पिवळा)
19 ऑक्टोबरला पिवळा रंग परिधान करून देवी स्कंदमातेची पूजा करणे खूप शुभ राहील. पिवळा रंग धारण केल्याने पूजन केल्याने सौभाग्य प्राप्त होते.



नवरात्री 2023 षष्ठी तिथी (हिरवा)
 20 ऑक्टोबर रोजी माता कात्यायनीची पूजा केली जाईल. या दिवशी भक्तांनी हिरवा रंग परिधान केल्याने प्रगतीचा मार्ग खुला होईल. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे. यामुळे सुखी वैवाहिक जीवन आणि संतती वाढीचे आशीर्वाद मिळतात.



नवरात्री 2023 सप्तमी तिथी (राखाडी) 
21 ऑक्टोबर रोजी देवी कालरात्रीच्या पूजेमध्ये राखाडी रंग परिधान करा. नवरात्रीमध्ये राखाडी रंगाची पूजा केल्याने दुष्टांचा नाश होतो.



नवरात्री 2023 अष्टमी तिथी (जांभळा)
22 ऑक्टोबर रोजी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवी महागौरीची पूजा करा. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते.


 


नवरात्री 2023 नवमी तिथी (मोरपिसी)
 23 ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी मोरपिसी हिरव्या रंगाचा वापर करा. मोरपिसी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Navratri 2023 : यंदा नवरात्रीला 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 5 राशीच्या लोकांना होणार धनलाभ