नवी दिल्ली : मोदी सरकार सत्तेत येऊन आज सात वर्षे पूर्ण झालीत तर सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये सांगण्यात आलंय की, आज कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करु नये वा कोणत्याही प्रकारचा उत्सव स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करु नये. त्या ऐवजी कल्याणकारी कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि कोरोना प्रभावित लोकांची मदत करावी. 


मोदी सरकार 2.0 ने दोन वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने भाजपच्या प्रत्येक खासदार आणि आमदारावर एक जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक खासदार आणि आमदाराने दोन गावांपर्यंत पोहोचावं आणि लोकांना मदत करावी असा आदेश देण्यात आला आहे. केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजप कार्यकर्ते ग्रामीण भागात मास्क, सॅनिटायझर आणि अन्न धान्य तसेच इतर आवश्यक साहित्यांचं वाटप करणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांनीही दोन गावांपर्यंत पोहोचावं, जर त्यांना ते शक्य झालं नाही तर किमान व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तरी त्यांनी त्या गावांशी संवाद साधावा असा आदेश पक्षाच्या हायकमांडकडून देण्यात आला आहे. 


कलम 370 हटवणं हे सर्वात मोठं यश
जम्मू-काश्मिरमधून कलम 370 हटवणं हे मोदी 2.0 सरकारचे सर्वात मोठं यश आहे, आणि याबद्दल लोकांमध्ये जागरुकता करावी असा आदेश पक्षाकडून कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्व्हक्षणातून असं समोर आलं आहे की देशातील 47.4 टक्के लोकांना कलम 370 हटवण्याचा निर्णय पसंत पडला आहे. तसेच 23.7 टक्के लोकांना राम मंदिर उभारण्याचा निर्णय पसंत पडला असल्याचंही या अहवालातून स्पष्ट झालंय. 


महत्वाच्या बातम्या :