मुंबई: तुम्ही जर स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी आज एक नवीन नोटिफिकेशन (New Notification) जारी केलं आहे. ज्यामध्ये कॅश काढण्याच्या नवीन नियमांबद्दल माहिती दिली आहे. या नवीन नियमानुसार आता कॅश विड्रॉल (Cash Withdrawal) ची सीमा वाढवली आहे. आता ग्राहक एका दिवसात 25 हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकणार आहे.
एका दिवसात काढू शकणार 25 हजारांपर्यंतची रक्कम
आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन ट्वीट करत SBI नं याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, 'कोरोना महामारीमध्ये आपल्या ग्राहकांसाठी एसबीआयनं चेक (Cheque) आणि विड्रॉल फॉर्मच्या माध्यमातून नॉन होम कॅश काढण्याची सीमा वाढवली आहे. आता ग्राहक आपल्या जवळच्या SBI ब्रॅंचमध्ये स्वत: जाऊन एका दिवसात आपल्या सेव्हिंग अकाऊंटमधून 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतो. तसेच ग्राहक स्वत:साठी चेकद्वारे एका दिवसाला एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकणार आहेत.
ATM मधून कॅश काढण्याचे काय आहेत नियम
SBI नं एका महिन्यात आपल्या सेव्हिंग अकाऊंट खातेधारकांसाठी (Saving Account Customers) 8 व्यवहार मोफत करण्याची सुविधा दिलेली आहे. यामध्ये 5 SBI एटीएम आणि 3 दुसऱ्या बॅंकांच्या ATM ट्रांजेक्शनचा समावेश आहे. यासोबतच नॉन मेट्रो शहरांमध्ये 10 फ्री ATM ट्रांजेक्शनच्या मोफत सुविधा बँकेकडून दिल्या जातात. यात 5 SBI एटीएम आणि 5 दुसऱ्या बॅंकांच्या ATM ट्रांजेक्शनचा समावेश आहे.