मुंबई : बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमधील अनेकांना पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवून फसवणूक केल्याचे प्रकार वाढू लागले आहेत. असाच एक प्रकार मुंबईमध्ये पुन्हा एकदा समोर आला असून या वेळेस चोरट्यांनी राज्य राखीव दलाच्या एका जवानाला टार्गेट केले आहे.


राज्य राखीव दलाचे जवान मनोहर पाटील यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील अनेकांना या चोरट्याने पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवले आणि याच मेसेजला बळी पडून मनोहर पाटील यांचा चुलत भाऊ जो गुजरात येथे राहतो, त्याने मनोहरला म्हणजेच मनोहरचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवणाऱ्याला टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये पाठवले होते. पैसे देऊनसुद्धा मनोहरने एकदाही फोन न केल्याने मनोहरच्या भावाला संशय आला आणि त्याने मनोहरला फोन केला. आणि पाठवलेल्या पैशांबाबत विचारले. त्यावेळी आपण असे कोणतेच पैसे मागितले नाही किंवा घेतले नाही, असं मनोहरने त्याच्या भावाला सांगितलं.


मनोहरनं दिलेलं उत्तर ऐकून भावाच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या भावाप्रमाणेच अनेकांना आपल्या फेसबुक या सोशल मीडिया अकाऊंटवरून पैशांची गरज असल्याचे मॅसेज गेल्याचे मनोहरच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मनोहरने उत्तर प्रादेशिक सायबर सेलमध्ये तक्रार केली आणि या तक्रारीवरून अशाच प्रकारे मनोहरच्या फेसबुक अकाऊंट वरून अनेकांना मेसेज केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर मनोहरचा गुजरातमध्ये राहणारा भाऊ ज्याने मनोहरच्या फेसबुक अकाऊंटवरुन आर्थिक मदतीसाठी आलेला मेसेज वाचून मनोहरला ज्या अकाऊंटवर पैसे पाठवले होते, त्या अकाऊंटची माहितीही घेतली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बँकेत धाव घेतली. ज्या बँक अकाऊंटवर मनोहरला त्याच्या भावाने पैसे पाठवले होते. ते अकाऊंट गोठवलं आणि मनोहरच्या भावाचं आणि या फसवणुकीला बळी पडलेल्या अनेकांचं आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवलं. पोलीस याप्रकरणी अधित तपास करत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :