Modi Govt Nine Year: मोदी सरकारने (Modi Government) आज केंद्रातील त्यांच्या सत्तेचा नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे मोदी सरकार त्यांच्या काळातील कामाकाजाची मोजणी आता करत आहे. सरकारकडून गेल्या नऊ वर्षांत कोणते मोठे मोठे निर्णय घेण्यात आले आणि लोकांसाठी काय करण्यात आले हे सांगण्यात येत आहे. तर विरोधी पक्ष काँग्रेसकडून (Congress) ही अपयशाची नऊ वर्ष आहेत, असं सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे, ज्यामध्ये मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसने बेरोजगारीपासून ते महागाईपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. 


काँग्रेसची मोदी सरकारच्या कार्यकाळावर टीका


काँग्रेसकडून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत म्हटलं आहे की, 'आज मोदी सरकारच्या कार्यकाळाची नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. ही अपयशाची नऊ वर्ष आहेत. ही देशाच्या वाईट स्थितीची नऊ वर्ष आहेत. या नऊ वर्षांत लोकांना महागाई, बेरोजगारी आणि हुकुमशाहीच्या निर्णयांचा त्रास सहन करावा लागला आहे. सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपले एकही आश्वासन पूर्ण केलं नाही आहे. ' असं म्हणत काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. 






जीएसटीपासून ते अग्निवीरपर्यंत उल्लेख 


काँग्रेसने म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आश्वासनं तर पूर्ण केली नाहीत तर आपल्यामुळे देशाला संकाटात टाकले आहे. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. अनेक लोकांचा बँकांच्या रांगांमध्ये उभं राहून मृत्यू झाला आहे. तर काँग्रेसने जीएसटीचा उल्लेख गब्बर सिंह टॅक्स (GST) असा केला आहे. या जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे देखील खूप नुकसान झाले आहे. तर 'अग्निवीर' या योजनेमुळे तरुणांचे देखील खूप नुकसान झाले आहे. 


ईडी-सीबीआयची भीती


काँग्रेसने ईडी आणि सीबीआयची देखील उल्लेख करत मोदी सरकारच्या कार्यकाळावर टीका केली आहे.  'जर कोणी आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबण्यात येतो, त्याला तुरुंगात टाकले जाते. तसेच ईडी आणि सीबीआयची देखील भीती दाखवली जाते.' असा आरोप देखील काँग्रेसने मोदी सरकारवर केला आहे. 


चीनच्या आक्रमकतेचा देखील केला उल्लेख 


काँग्रेसने चीनचा उल्लेख करत म्हटले आहे की, 'आज चीन आपल्याच देशाचं संरक्षण करण्यापासून आपल्याला थांबवत आहे. आपले जवान देशासाठी चीनच्या सीमेवर शहीद देखील झाले आणि त्यानंतर सरकार अखेरीस चीनला वेठीस धरु लागले.' 


'जनता योग्य ते उत्तर देईल'


काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'यांच्या अपयशाच्या अनेक गोष्टी आहेत. यांच्या या गोष्टी एका पुस्तकात जरी लिहिल्या तरी त्यामधल्या अनेक गोष्टी लिहायच्या राहून जातील. ही अपयशाची नऊ वर्ष आहेत. त्यामुळे देशीतील जनता आता त्यांना योग्य ते उत्तर देईल. कर्नाटकाच्या निवडणुका या गोष्टींचा पुरावा आहे. देशातील जनता वाट बघतेय आणि योग्य वेळी ते योग्य उत्तर देखील देतील.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pune Crime news :  हॅलो, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी बोलतोय! मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून कॉलेजमध्या प्रवेश देत उकळले पैसे, तरुणाला बेड्या