तामिळनाडू : मंदिराच्या फोटोवर पॉर्न स्टार मिया खलीफाच्या फोटोमुळे नवा वाद उफाळून आला आहे. पॉर्न स्टारचा फोटो एखाद्या धार्मिक ठिकाणी दिसल्यावर लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. धार्मिक पोस्टरवर अमेरिकन पॉर्न स्टार मिया खलिफाचा फोटो वापरल्यावर नवीन वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूमधील कांचीपुरम येथील ही धक्कादायक घटना समोर आली आहे.   मंदिराच्या एका कार्यक्रमाच्या पोस्टरवर या पॉर्न स्टारचा फोटो दिसला. आता हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.


मंदिराच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर मिया खलिफाचा फोटो


तामिळनाडूमधील कांचीपुरमजवळील कुरुविमलाई या गावात हा विचित्र प्रकार घडला आहे. त्या गावातील मपिल्लई विनयागर मंदिरात नागथम्मन आणि चेल्लीअम्मनची मंदिरे आहेत. या मंदिरात आदिवेली अम्मान उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या मंदिरात 9 ऑगस्ट रोजी माँ अम्मान म्हणजेच पार्वती मातेचा ओटीभरण सोहळा होणार आहे. 


आदि उत्सवाच्या पोस्टरवर पॉर्न स्टारचा फोटो


या सोहळ्यासाठी भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यातील एका पोस्टरवर अमेरिकन पॉर्न स्टार मिया खलिफाचा फोटो दिसल्याने लोकांना धक्काच बसला. त्या पोस्टरवर मिया खलिफा डोक्यावर कलश दिसत असून तिने पिवळा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. 






आदि उत्सवाची जोरदार तयारी


आदि उत्सवाच्या दिवशी लोक नदीकाठावर पूजा करतात आणि त्यांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. कुरुविमलाई येथील नागथम्मन आणि सेल्ली अम्मन मंदिरांमध्ये आदी उत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ठिकठिकाणी लाईटिंग आणि होर्डिंग्ज लावून आणि लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा आणि मिया खलिफाच्या फोटोचा काही संबंध नाही, त्यामुळे हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर याचा व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे.


तामिळनाडूच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग


आदि उत्सव या सणाच्या दिवशी पाऊस आणि नदीची पूजा करुन त्यांचे आभार मानले जातात. तामिळनाडूमध्ये, विशेषतः माँ अम्मन म्हणजे पार्वती मातेच्या मंदिरांमध्ये मोठ्या धूमधडाक्यात हा सण साजरा केला जातो. हा उत्सव बरेच दिवस चालतो, ज्यामध्ये देवीची पूजा करतात, भजन आणि कीर्तन गातात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. हा सण तामिळनाडूच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे.