Weather Update : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आता थंडी कमी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसात तापमान वाढल्यामुळे उत्तर भारतात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासीन दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये रात्री आणि पहाटे धुके पडत आहे, त्यामुळे तिथे थंडी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये आज म्हणजेच 15 फेब्रुवारीला आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  दरम्यान, महारष्ट्रात कमील आणि किमान तापमानत चढ उतार सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापासून उत्तर महारष्ट्रासह विदर्भाच्या किमान तापमानात घट झाली आहे.


महाराष्ट्रातील दक्षिण भागात उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. तापमनात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भ सोडला तर येत्या पाच दिवसात राज्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदज हवामान विभागाने वर्तवला आहे. राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या सूर्यप्रकाशामुळे नागरिकांना थंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. आजही आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी आणि सायंकाळी थोडी थंडी वाजत आहे. ती थंडी पुढील सहा दिवस कायम राहणार आहे.  दरम्यान, शुक्रवारी दिल्ली NCR मध्ये हवामानात बदल होऊ शकतो. शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


पंजाबमध्येही हळूहळू थंडी गायब होताना दिसत आहे. राज्यात तापमानात वाढ होत आहे. येथेही सकाळी धुके असले तरी दिवसभरात हवामान निरभ्र असून सूर्यप्रकाश पडत आहे. भारतीय हवामान विभागाने या आठवड्याच्या सुरुवातीला बहुतांश भागात हवामान स्वच्छ होणार आहे. तर शेवटी ढगाळ वातावरण असेल आणि पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे थंडी जाणवण्याचीही शक्यता आहे. 


या आठवड्यात पंजाबमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. दिवसा सूर्यप्रकाशामुळे थंडीचा प्रभाव कमी होईल. दुसरीकडे प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा वाढू लागली असून, पाऊस पडल्यानंतर ती कमी होईल, असा अंदाज आहे. दरम्यान हिमाचल प्रदेशात आज पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे डोंगराळ जिल्ह्यांच्या हवामानात हा बदल व्यक्त करण्यात आला आहे. शिमला, सोलन, सिरमौर, मंडी, कुल्लू, चंबा आणि उच्च हिल जिल्हे किन्नौर आणि लाहौल-स्पीती या मध्यवर्ती डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 17 फेब्रुवारीपर्यंत हवामान उग्र राहण्याचा अंदाज आहे.


महत्त्वाच्या बातम्या:



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा