Petrol-Diesel Price Today 15th February 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. सात वर्षांतील सर्वाधिक दर असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीने आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर 2014 नंतर आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोमवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 96.16 डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. आधीपासूनच महागाईत होरपळत असलेल्या जनतेला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेल आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. असं असलं तरीदेखील देशात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत.
सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol Price Today) असल्याचं बोललं जात आहे. अशातच निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कडाडणार असल्याचं बोललं जात आहे. कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरपेक्षा अधिक होणार?
कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरपेक्षा अधिक होणार असल्याचे म्हटले जात आहे. Goldman Sachs च्या मते, 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 100 पर्यंत पोहोचू शकते आणि 2023 मध्ये प्रति बॅरल $ 105 च्या पुढे जाऊ शकते. त्याच वेळी, जेपी मॉर्गन 2022 मध्ये $ 125 प्रति बॅरल आणि 2023 मध्ये प्रति बॅरल $ 150 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करत आहे.
देशातील चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.
देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
- दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...