नवी दिल्ली :  जम्मू काश्मिरमधील पुंछच्या सुरणकोट येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीत आज अधिकाऱ्यासह (जेसीओ) चार जवान शहीद झाले आहेत. या परिसरात तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर  दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाई करण्यात आलेल्या कारवाईत ज्युनिअर कमिशन ऑफिसरसह(जेसीओ) चार जवान शहीद झाले आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा मंत्रालयाच्या मुख्य प्रवक्त्याने सांगितले की, सुरनकोट परिरसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर डीकेजी जवळील गावात तातडीने ऑपरेशन सुरू केले.


संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओने सांगितले की, गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सूरनकोट परिसरातील आजूबाजूच्या गावात लष्कराचे जवान पोहचले आणि शोधमोहिम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून लष्करावर गोळीबार सुरू करण्यात आला. या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि लष्कराचे 4 जवान चकमकीत जखमी झाले.या जवानांना जवळील उपचार केंद्रावर दाखल करण्यात आले, पंरतु त्यांचे निधन झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चरमेरच्या जंगलात लपल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची देखील माहती होती. माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी परिसरात शोधमोहिम सुरू केली.






या अगोदर जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग आणि बांदीपूरा जिल्ह्यात  सोमवारी झालेल्या चकमकीत दो दहशतवादी ठार केले. या चकमकीत एक पोलिस अधिकारी जखमी झाले.  दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील वेरीनाग भागातील खगुंड येथे घेराव आणि शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याने ऑपरेशन चकमकीत बदलले. गोळीबारालाही जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.