नवी दिल्ली : मेरठमधील एका मौलवींवर विचित्र परिस्थिती ओढावली आहे. विशेष म्हणजे, ही परिस्थिती त्यांच्या पत्नीनेच त्यांच्यावर आणली आहे. मौलवीसाहेबांना त्यांच्या पत्नीने दाढी काढली नाहीतर, आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.


 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मेरठमधील 36 वर्षीय अर्शद बदरूद्दीन त्यांच्या पत्नीने दाढी काढली नाहीतर आत्महत्या करण्याची धमकी दिलेली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी मैलवींनी केली आहे.

 

या धमकीनंतर मौलवींनी आपली पत्नी स्मार्टफोन वापरते. या माध्यमातून इतर पुरुषांसोबत चॅटींग करते. तसेच ती आपल्याला वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

या प्रकरणी मौलवींनी मेरठच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार केली असून आपल्या पत्नीचे काऊन्सिलिंग करण्याची मागणी केली आहे.

 

अर्शद यांना चार मुले असून आपली पत्नी सतत चॅटींग करते. त्यामुळे मुलांच्या पालन पोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अर्शद यांनी केला आहे. तसेच आपल्या पत्नीने ईदच्या सणासाठी मुलांसोबत आपल्यालाही अधुनिक कपडे खरेदी करण्याचा आग्रह धरला होता. याशिवाय तिने ईदनंतर गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला वाचवण्यासाठी गळफास घराचा दरवाजा तोडावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले.