जून महिन्यामध्ये मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या गौतम सुदर्शन आणि आशिष पौल या तरुणांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन कुत्र्याला खाली फेकलं आणि त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर प्राणीप्रेमींना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं. कुत्र्याचा शोध घेतल्यानंतर त्याचं भद्रा असं नामकरण करण्यात आलं. भद्राच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. या कृत्यासाठी दोघांना कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी केली जात होती.
कुत्र्याला गच्चीवरुन फेकणारे एमबीबीएस विद्यार्थी परागंदा
प्राणीप्रेमींनी पोलिसात धाव घेतल्यानंतर ते भाड्यावर राहत असलेल्या खोलीच्या दिशेने कूच केलं. मात्र याची कुणकुण लागल्यामुळे दोघंही जण फरार झाले. इतकंच नाही तर या नीच व्यक्तींना कॉलेजमधून निलंबित करा, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली होती. या प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाने एमजीआर मेडिकल विद्यापीठाची समिती स्थापन केली होती. या समितीने प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन लाखांचा दंड सुनावला. अॅनिलमल वेल्फअर बोर्डाकडे हा दंड भरावा लागणार आहे.