MCD Bill : महापालिका एकीकरण विधेयक राज्यसभेत आज मंजूर झाले आहे. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यामुळे दिल्लीतील तीन महानगरपालिका एकत्र होणार आहेत. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "अरविंद केजरीवाल यांना घाबरून मोदी सरकारने हे विधेयक आणल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे.
संजय सिंह म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ते (भाजप) घाबरतात. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये आमचे डिपॉझिट जप्त झाल्याचे भाजपने सांगितले. परंतु,भाजपचे जगभरात डिपॉझिट जप्त करण्याचा विश्वविक्रम आहे."
"दिल्ली सरकारने एमसीडीला करोडो रुपये दिले आहेत. तर केंद्राकडून दिल्ली सरकारला दरवर्षी 325 कोटी रुपये मिळतात. तुम्हाला निवडणूक लढवायची नसेल तर या विधेयकाला केजरीवाल फोबिया असे नाव द्या. हे विधेयक तुमच्या भ्याडपणाची, फरारीपणाची आणि संविधानाला चिरडण्याची कहाणी लिहील, असा टोला संजय सिंह यांनी भाजपला लगावला आहे.
दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या एकत्रीकरणाशी संबंधित दिल्ली महानगरपालिका (सुधारणा) विधेयक 2022 लोकसभेने मंजूर केल्यानंतर आज ते राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. हे विधेयक वरिष्ठ सभागृहात मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, "दिल्ली सरकारची सावत्र आईसारखी वागणूक तिन्ही महानगरपालिकांना योग्य प्रकारे काम करण्यापासून रोखत आहे." अमित शहा यांच्या या याच टिकेला संजय सिंह यांनी उत्तर देताना भाजपवर टीका केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या