Coal India: देशात यावर्षीही कोळशाचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक सरकारी कंपनी कोल इंडिया वीज (Coal India) प्रकल्पांना कोळसा पुरवठा करण्यास प्राधान्य देत आहे, ज्यामुळे कोळशावर अवलंबून असलेल्या अशा उद्योगांसमोर पुरवठा संबंधित संकट निर्माण झालं आहे.


उन्हाळा ऋतू सुरू झाला असून अशा परिस्थितीत विजेची मागणी वाढली आहे. येत्या काळात विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोळशाचा साठा वीज प्रकल्पांमध्ये निर्धारित लक्ष्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे कोल इंडिया वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा वाढवत आहे. रविवारी ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा 25.2 दशलक्ष टनांवर आला होता. जो कोळसा मंत्रालयाने निर्धारित केलेल्या 45 दशलक्ष टनांच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोल इंडिया नॉन पॉवर वापरकर्त्यांना 2,75,000 टन कोळशाचा पुरवठा करत होती. ज्यात दररोज सरासरी 17 टक्क्यांनी घट झाली आहे. पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी रेल्वेचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत कोल इंडियाने औद्योगिक ग्राहकांना रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने ट्रकमधून कोळसा पुरवठा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नॉन पॉवर वापरकर्त्यांच्या कोळशाच्या पुरवठ्यात घट होणार आहे. एका रेल्वेमध्ये 4000 टन कोळसा वाहून नेण्याची क्षमता असते तर ट्रकमध्ये एकावेळी फक्त 25 टन कोळसा वाहून नेता येतो. अ‍ॅल्युमिनियम, स्टील, सिमेंट प्लांट्स व्यतिरिक्त रासायनिक कारखानेही देशात कोळशावर आधारित आहेत.


दरम्यान, 2021-22 कोल इंडियाने 622 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले आहे. जे 2020-21 मध्ये 607 दशलक्ष टन होते. मात्र कोळशाची मागणीत वाढ झाली आहे. रशियन-युक्रेनियन युद्धामुळे कोळशाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे आयात कोळशावर अवलंबून असलेल्या वीज प्रकल्पांनी त्यांची खरेदी कमी केली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha