Matchbox Price : आधीच कोरोना संकटामुळे नोकरी-व्यावसायावर गदा आला असताना महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडे मोडलं आहे. त्यातच आता काडीपेटीची किंमतही वाढणार आहे. मागील 14 वर्षांपासून काडीपेटीच्या किंमतीत बदल झाला नव्हता. पण आता डिसेंबरपासून काडीपेटीची किंमत दुपट्ट होणार आहे. एक रुपयांना मिळणारी काडीपेटी आता दोन रुपयांना मिळेल. डिसेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. 2007 मध्ये काडीपेटीच्या किंमतीत बदल झाला होता. त्यावेळी 50 पैशांना मिळणारी काडीपेटी 1 रुपयाला झाली होती. मागील 14 वर्षांत प्रत्येक गोष्टींच्या किंमतीमध्ये बदल झाला. कदाचीत काडीपेटी एकमेव गोष्ट असेल ज्याच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नसेल. मात्र, आता एक रुपयांना मिळणारी काडीपेटी दोन रुपयांना मिळेल. काडीपेटी उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्यांच्या सहमतीनंतर दरवाढ निश्चित करण्यात आली.
कच्चा मालाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे काडीपेटीच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. काडीपेटी तयार करणाऱ्यांनी सांगितले की, काडीपेटी तयार करण्यासाठी विविध 14 कच्या मालांची गरज पडते. तसेच एक किलोग्रॅम फास्फोरसची किंमत 425 रुपयांवरुन 810 रुपये झाली आहे. तसेच मेणाची किंमतही 58 रुपयांवरुन 80 रुपये झाली आहे. बाहेरील बॉक्स बोर्डची किंमत 36 रुपयांवरुन 55 रुपये झाली आहे. तर आतील बॉक्स बोर्डची किंमत 32 रुपयांवरुन 58 रुपये इतकी झाली. कागद, पोटॅशिअम क्लोरेट आणि सल्फरच्या किंमतीमध्येही दहा तारखेंपासून वाढ झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे आर्थिक गणित कोलमडलं आहे. त्यामुळे काडीपेटीच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
600 काडीपेटीचा बंडल सध्या 270ते 300 रुपयांच्या किंमतीमध्ये मिळत असल्याचं वीएस सेथुरथिनम यांनी सांगितलं. याच्यामध्ये 60 टक्के वाढ करुन 430-480 इतकी किंमत करण्यात आल्याचे सेथुरथिनम म्हणाले. यामध्ये 12 टक्के जीएसटी आणि वाहतूकीचा समावेश नसल्याचं सांगितलं.
हेही वाचा :
Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरुच, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
आता टीव्ही पाहणंही महागणार! 1 डिसेंबरपासून चॅनल्स पाहणं 50 टक्के अधिक खर्चिक