Petrol Diesel Price 23 Oct 2021 : एकीकडे कोरोना महामारीच्या संकटामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ बसत आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लीटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 107.24 रुपये इतकी झाली आहे. तर डिझेल 95.97 रुपयांवर पोहचलं आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनेही पेट्रोल-डिझेल दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 113.12 रुपये झालं आहे तर डिझेल प्रतिलीटर 104.00 रुपयांवर पोहचलं आहे. देशातील सर्व मोठ्या महानगरांपैकी पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती क्रमशः 107.78 रुपये प्रति लिटर आणि 104.22 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 99.08 रुपये प्रति लिटर आणि 100.25 रुपये प्रति लिटर आहे. 

20 दिवसांत प्रतिलीटर 6.05 रुपयांनी महागलं पेट्रोल – 
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरु झाला होता. मागील 20 दिवसांपासून देशात पेट्रोल जवळपास प्रतिलीटर 6.05 रुपयांनी महागलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे इंधन दरवाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढ सुरु आहे.  

23 दिवसांत प्रतिलीटर 7.35 रुपयांनी महागलं डिझेल –
मागील काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. अनेक राज्यात डिझेलनं शंभरी पार केली आहे. मागील 23 दिवसांपासून देशात डिझेल प्रतिलीटर 7.35 रुपयांनी महागलं आहे.  

शहराचं नाव पेट्रोल रुपये/लीटर डिझेल रुपये/लीटर
दिल्ली 107.24 95.97
मुंबई 113.12 104.00
चेन्नई 104.22 100.25
कोलकाता 107.78 99.08
भोपाळ 115.90 105.27
रांची 101.56 101.27
बेंगळुरु 110.98 101.86
पाटना 110.84 102.57
चंदीगढ़ 103.21 95.68
लखनौ 104.20 96.42
नोएडा 104.42 96.62

(स्रोत- IOC SMS)

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ? 

जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे. 

देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी 

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.