नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख मसूद अजहरने पाकिस्तानच्या लष्करी रूग्णालयातून पुलवामा हल्ल्याचे आदेश दिले होते. मागील चार महिन्यांपासून मसूद अजहर इस्लामाबादजवळच्या रावळपिंडी येथील पाकिस्तानच्या लष्करी रूग्णालयात उपचार घेत आहे.


जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच भारतीय तपास यंत्रणा पाकिस्तानविरोधातील पुरावे गोळा करत आहेत. या तपासादरम्यान मसूद अजहरने रावळपिंडीतील पाकिस्तानी लष्करी रूग्णालयातून जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा : पुलवामामध्ये जवानांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांबाबत 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद म्हणतो....

हल्ल्याच्या आठ दिवस अगोदर अजहरने त्याच्या संघटनेतील दहशतवाद्यांना एक व्हॉईस मॅसेज पाठवला होता. ज्यामध्ये त्याने हल्ल्याबाबतचे आदेश दिले होते. दरम्यान काश्मीरमधील गुप्तचर संस्थेच्या आधिकाऱ्याने सांगितले की, काश्मीरमध्ये अद्याप 60 ते 70 दहशतवादी लपून बसले आहेत. त्यापैकी 35 पाकिस्तानी आहेत. 25 ते 35 स्थानिक आहेत

VIDEO | पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना धास्ती, अनेकांनी बस्तान हलवलं | काश्मीर | एबीपी माझा



पुलवामा हल्ल्यानंतर भारत राजकीय आणि लष्करी पातळीवर पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय तपास यंत्रणा पाकिस्तानविरोधातील पुरावे गोळा करत आहेत. या तपासांत मसूद अजहरबाबतची आणि त्याचे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांशी असलेले संबध याबाबतची माहिती भारतीय तपास यंत्रणांनी मिळवली आहे.

.