श्रीनगर : भारतीय जवान निधड्या छातीने जिवाची पर्वा न करत सीमेवर देशाचं संरक्षण करत असतात. भारतीय सैनिकांची हिमतीचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. शुक्रवारी जम्मूच्या पुलवामा येथे अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबच यांचा हा व्हिडीओ आहे.
औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते. औरंगजेब यांची हत्या करणाऱ्या क्रूर दहशतवाद्यांनी हत्येपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओत औरंगजेब निर्भिडपणे दहशतवाद्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. 'तू मेजर शुक्ला यांचा गार्ड आहेस का?', असा प्रश्न दहशतवादी औरंगजेबला विचारला. त्यावर औरंगजेबने यांनीही 'होय' असं उत्तर दिलं.
दहशतवादी आणि शहीद जवान औरंगजेब यांचं संभाषण
दहशतवादी- क्या नाम है तेरा?
शहीद औरंगजेब- मेरा नाम औरंगजेब
दहशतवादी- बाप का क्या नाम है?
शहीद औरंगजेब- मोहम्मद हनीफ
दहशतवादी- किधर रहता है ?
शहीद औरंगजेब- पुंछ रहता हूं
दहशतवादी- ड्युटी किधर है ?
शहीद औरंगजेब- शालीमार, पुलवामा, शालीमार कॅम्प
दहशतवादी- किसके साथ था तू, शुक्ला के साथ
शहीद औरंगजेब- हां
दहशतवादी- क्या ड्युटी है तेरी ?
शहीद औरंगजेब- मैं सिपाही, एक तरह से जो पोस्ट पर ड्यूटी देता है
दहशतवादी- तो शुक्ला का गार्ड भी तू ही है
शहीद औरंगजेब- हां
दहशतवादी- उसके साथ ऑपरेशन में तू ही जाता है ना
शहीद औरंगजेब- हां
दहशतवादी- मोहम्मद भाई के एन्काऊंटर में तू ही था
शहीद औरंगजेब- मोहम्मद रफी ?
दहशतवादी- हां मोहम्मद रफी, तलहा
शहीद औरंगजेब- हां मैं ही था
दहशतवादी- तो तलाह लोगों का एनकाउंटर तूने किया
शहीद औरंगजेब- जी
दहशतवादी- लास्ट एनकाउंटर भी तूने किया था, जसीम का
शहीद औरंगजेब- नहीं
दहशतवादी- किसने किया
शहीद औरंगजेब- मेरे हाथ में लग गई थी
दहशतवादी- क्या लग गया था
शहीद औरंगजेब- मेरा हाथ टूट गया था, अंगूठा टूट गया
VIDEO:
कोण आहेत मेजर शुक्ला?
मेजर शुक्ला यांच्या नेतृत्वातील टीमनं दहशतवादी समीर अहमद भट उर्फ समीर टायगरचा खात्मा केला होता. दहशतवादी समीर टायगरने अतीउत्साहात व्हिडीओ मेसेजच्या मदतीने मेजर शुक्ला यांना आव्हान केलं होतं. 'आईचं दूध प्यायलं असेल तर समोर ये आणि लढ', असं आव्हान समीर टायगरने मेजर शुक्ला यांना दिलं होतं. धमकीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत मेजर शुक्ला यांनी समीर टायगरला यमसदनी धाडलं होतं.
कोण होता समीर टायगर?
समीर टायगर 2016 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. समीर पुलवामाचा रहिवासी होता. तसंच हिजबुलच्या अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता. बुरहान वाणीनंतर समीरला काश्मीरच्या पोस्टर बॉयच्या रुपात सादर करण्यात आलं होतं. समीरने दहशतवादी वसीमच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन गोळीबारही केला होता. यामुळेच समीर टायगरवर 10 लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं.
काय आहे प्रकरण?
औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून त्यांची पोस्टिंग 44RR शादीमार्गमध्ये होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतताना, दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य होते. औरंगजेब सकाळी नऊच्या सुमारास एका खासगी वाहनातून शोपियांच्या दिशेने येत होते. त्यावेळी कलमपोराजवळ अतिरेक्यांनी वाहन अडवत त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.