Amar Abdullah On The Kashmir Files : काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा 'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा सुपरहिट ठरत आहे. या सिनेमाने एका आठवड्यात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमासंदर्भात राजकीय वर्तुळातदेखील चर्चा होत आहे. 'द काश्मीर फाइल्स' सिनेमात संपूर्ण सत्य दाखवण्यात आलेले नाही, अशी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


ओमर अब्दुल्ला म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमात संपूर्ण सत्य दाखवण्यात आलेले नाही. काश्मिरी पंडित जेव्हा काश्मिरमधून निघून गेले तेव्हा फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री नव्हते. तर त्यावेळी त्यावेळी राज्यपाल राजवट लागू होती.





ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा आहे की डॉक्युमेंटरी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काश्मिरी पंडितांनाच पळून जावे लागले असे नाही. तर मुस्लिम आणि शीखही मारले गेले. त्यांनाही काश्मीरमधून पळून जावे लागले. कश्मीर फाइल्स सिनेमाच्या निर्मात्यांना काश्मिरी पंडितांचे पुनरागमन नको आहे.


'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा आतापर्यंत देशातील 7 राज्यांनी करमुक्त केला आहे. या राज्यांत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा सिनेमा भाष्य करणारा आहे.


संबंधित बातम्या


The Kashmir Files Box Office Collection : 'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई


The Kashmir Files :  'द कश्मीर फाइल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना Y दर्जाची सुरक्षा; काय आहे कारण?


Nagraj Manjule : झुंड आणि कश्मीर फाइल्सवरुन सोशल मीडियावर मतमतांतर, नागराज मंजुळे म्हणाले...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha