The Kashmir Files : सध्या द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट चर्चेत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचे देखील अनेकांनी कौतुक केलं. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत तर काही या चित्रपटाला विरोध करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना आता Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, विवेक यांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही लोक धमक्या देत होते.
इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे गृह मंत्रालयाने विवेक अग्निहोत्री यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. याचा अर्थ आता पूर्ण देशात विवेक कुठेही गेले तरी CRPF चे जवान त्यांच्या सोबत असतील.
Y दर्जाची सुरक्षा म्हणजे काय?
Y दर्जाची सुरक्षा म्हणजे आठ सुरक्षारक्षक तैनात केले जातात. तसेच व्हिआयपी व्यक्तीला ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये त्या न्यक्तीच्या घरी पाच सशस्त्र स्टॅटिक गार्ड तैनात केले जातात. तसेच, तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षारक्षक कार्यरत असतात.
'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाची निर्माती अभिषेक अग्रवाल आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केली आहे. मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
महत्वाच्या बातम्या
- sunny leone : 'आमदार निवास'मध्ये सनी लिओनी!, शांताबाई गाण्यावर थिरकणार
- Bella Hadid : अवघ्या 14व्या वर्षी नाकावर शस्त्रक्रिया केली, मॉडेल बेला हदीदला आता होतोय पश्चाताप!
- Holi 2022 : बॉलिवूडमध्ये कसा आणि कधी सुरु झाला होळीचा ट्रेंड? मेहबूब खानशी खास कनेक्शन!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha