Nagraj Manjule : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड (Jhund) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या दोन चित्रपटांबद्दल सोशळ मीडियावर अनेक नेटकरी मत मांडत आहेत. याबद्दल नुकतीच नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


नागराज मंजुळे यांनी सांगितले, 'जे म्हणताहेत की फक्त मी झुंडच बघणार ते ही चुकीचं आहे. तुम्ही झुंड बघा, पावनखिंड बघा, कश्मीर फाइल्स बघा किंवा अजून जगात काही असेल तर तेही बघा. किंवा काहीच बघू नका. हे जे चाललंय ते कोंबड्याच्या झुंजी लावून दिल्यासारखं आहे, ज्याला काही अर्थ नाही. माझ्या प्रेमापोटी जरी कुणी ऍग्रेसिव्ह होत असेल तर ते चुकीचं आहे. ते मला आवडणार नाही. कलाकृतीला कलाकृती म्हणून पाहा. आम्ही फिल्म बनवणारे दिग्दर्शक, निर्माते घरी आणि तुम्ही थिएटरबाहेर हाणामाऱ्या करणार, हे चुकीचं आहे. हा सिनेमा आहे, तो बघा, विचार करायचा असेल तर करा, तुम्हाला पटलं तर ठीक. कलाकृती म्हणून पहा, त्यातून काहीशी अक्कल आली तर तुम्हालाच फायदा होईल.' 


अहमदनगर जिल्ह्यातून चित्रपट क्षेत्रातील करीयरची सुरुवात झाली तिथे झुंडला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटलं. सोबतच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता, त्यांच्यासोबत काम करताना कामाची स्केल वाढते असं मत त्यांनी व्यक्त केलं. एखाद्या चित्रपटातील कथानकांवरून जातीय विचार व्यक्त करणे योग्य नाही, चित्रपटाला चित्रपट म्हणूनच पाहावं असंही त्यांनी म्हटले आहे.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha