Holi 2022 : देशभर आज होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. विविध राज्यांमध्ये हा सण साजरा करण्याची वेगवेगळी प्रथा आहे. झारखंडमध्येही अशीच एक अनोखी प्रथा आहे. झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यातील बार्ही चातकपूर या गावात होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. चातकपूर गावात होळीच्या दिवशी अनेक लोक जमिनीत रोवलेला लाकडी खांब उपटण्याचा प्रयत्न करतात. यावेळी शेतात जमलेला जमाव त्यांच्यावर दगडफेक करतो. खांब उपटण्यात जे यशस्वी होतात त्यांना भाग्यवान मानले जाते.
खांब उपटणे आणि दगड फेकून मारण्याच्या या परंपरेमागे कोणतेही वैर नसते. तर लोक खेळाप्रमाणे बंधुभावाच्या भावनेने ही परंपरा पाळतात. गेल्या काही वर्षांत बार्ही चातकपूरची ही होळी पाहण्यासाठी लोहरदगा व्यतिरिक्त आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक या गावात येत असतात. परंतु, या गावातील लोकांनाच या उत्सवात सहभागी होण्याची परवानगी आहे. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा कधी सुरू झाली आणि त्यामागील कथा काय आहे? हे कोणालाच माहीत नाही.
होळी दहन करण्याच्या दिवशी गावातील पुजारी खांब जमिनीत गाडतात आणि दुसऱ्या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येऊन तो उपटून दगडफेक करतात. दगड लागल्याने दुखापत होण्याची भीती सोडून देऊन लोक खांब उपटण्यासाठी प्रयत्न करतात.
या दगडफेकीत आजपर्यंत कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या खेळात गावातील मुस्लिम लोकही सहभागी होतात. या गावातील सर्व लोक बंधुभावाने होळीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
महत्वाच्या बातम्या
Holi 2022: सचिन तेंडुलकर यांच्याकडून चाहत्यांना होळीच्या खास शुभेच्छा
Happy Holi 2022: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं होळी सेलिब्रेशन! एकमेकांवर रंग उधळून खेळाडूंनी लुटला आनंद
Happy Holi 2022 Wishes : तुमच्या प्रियजनांना 'या' खास शुभेच्छा देऊन होळीचा आनंद द्विगुणित करा