उरी हल्ल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या पोलीस दलातील कॉन्स्टेबल मनोज कुमारने सादर केलेली कविता सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली होती. या कवितेत त्याने दहशतवाद्यांना चांगलेच फटकारले होते. तसेच दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला ललकारले होते. या व्हायरल व्हिडिओमुळे मनोज कुमार हा कोट्यावधी भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला होता.
पण आता त्याला दहशतवाद्यांकडून धमक्या मिळत आहेत. मनोज कुमारने याबाबतची माहिती आपल्या फेसबुकवरुन दिली. विशेष म्हणजे, जर त्यांच्याशी आमना सामना झाला तर मोठं वादळ येईल असं त्यानं फेसबूक पोस्टवर लिहलं आहे.
व्हिडिओ पाहा