'राफेल डीलच्या संदर्भातील फाईल्स आपल्या बेडरुम मध्ये आहेत', असे मनोहर पर्रिकर बोलल्याचा दावा करणारी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची कथित ऑडिओ क्लीप काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या क्लिपच्या आधारावर काँग्रेसने पर्रिकर यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. राफेल संदर्भातील सत्य बाहेर आल्यास त्यात झालेला भ्रष्टाचार देशासमोर येईल आणि तसे घडू नये यासाठी प्रसंगी पर्रिकरांवर हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवली जावी अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
राफेल डीलमधील भ्रष्टाचार ज्यांना समोर येऊ द्यायचा नाही ते पर्रिकरांच्या जीवाला धोका पोहचवू शकतात. त्यामुळे राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी आणि पर्रिकरांना आणखी सुरक्षा दिली जावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.