दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्व विद्यापीठांना शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे परीक्षा न घेणे आणि पदवी प्रमाणपत्र न देणे अन्याय होईल. हा निर्णय राज्यातील सर्व विद्यापीठांना लागू आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत एकसमान सूत्र ठरवून पदवी प्रदान करावी, मंत्री उदय सामंत यांचं केंद्राला पत्र
दिल्ली मधील सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षांबाबत केंद्राने निर्णय घ्यावा, असेही सिसोदिया म्हणाले. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून देशातील केंद्रीय विद्यापीठांच्या परीक्षांबाबतही असाच निर्णय घ्यावा, असे निवेदन दिले आहे.
दिल्लीत एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण
देशात कोरोना विषाणू प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये राजधानी दिल्ली तिसऱ्या नंबरवर आहे. दिल्लीत 1 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पैकी 3 हजार 300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत 21 हजार 146 संक्रमित रुग्णावंवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 84 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
Rahul Gandhi On UGC | कोरोना संकटात परीक्षा घेणं अन्यायकारक : राहुल गांधी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI