Manipur Landslide : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलन झाले आहे. यामध्ये जवळपास ढिगाऱ्याखाली 25 जवान दबले गेले असून अनेक जवान बेपत्ता आहेत. इम्फाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. परंतु, याच ठिकाणी भूस्खलन झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. खराब हवामान आणि वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत. परंतु, ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. 


भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार,  TA च्या 107 तुकड्यांना 29 जूनच्या रात्री नोनी जिल्ह्यातील तुपल रेल्वे स्टेशनजवळ जोरदार भूस्खलनाचा फटका बसला. बांधकामाधीन मणिपूर-जिरिबाम रेल्वे मार्गाचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी तैनात असलेले सैनिक उपस्थित होते. भूस्खलनाच्या घटनेनंतर भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने बचाव कार्य सुरू केले.


मदत आणि बचाव कार्य चालू असलेल्या यंत्रसामग्रीचा उपयोग रेल्वेच्या साइट इंजिनीअरिंग प्लांटमधून मदत आणि बचाव कार्यासाठी करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साडेपाच वाजेपर्यंत  13 जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींवर आर्मी मेडिकल युनिट येथे उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी जवानांना इम्फाळ आणि इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. 


खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. लष्कराच्या म्हणण्यानुसार, खराब हवामान आणि पुन्हा भूस्खलन झाल्यामुळे त्याचा बचाव कार्यावर परिणाम होत आहे.  मात्र बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. लष्कराचे हेलिकॉप्टरही बचाव कार्यासाठी तयार असून ते हवामान साफ ​​होण्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 25 जवान बेपत्ता आहेत. भूस्खलनामुळे स्थानिक इलजाई नदीच्या प्रवाहावरही परिणाम झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या


Kulgam Encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार


DRDO कडून स्वदेशी Anti-Tank Guided Missile ची यशस्वी चाचणी, अचूक लक्ष्य सहज भेदले