Anti-Tank Guided Missile : भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय लष्कराने स्वदेशी बनावटीच्या एंटी टॅंक मिसाइल या रणगाड्याची यशस्वी चाचणी घेतली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील केके रेंजमध्ये मंगळवारी ही चाचणी घेण्यात आली. याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

 

 

अचूकतेने लक्ष्य गाठण्यात यश मिळवले संरक्षण मंत्रालयाकडून माहिती देताना सांगण्यात आले आहे की, एंटी टॅंक मिसाइल अर्जुन बॅटल टँकमधून डागण्यात आले. ज्याने पूर्ण अचूकतेने मारा करून कमीत कमी अंतराचे लक्ष्य सहज भेदले. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ही चाचणी डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने अहमदनगर, महाराष्ट्रातील केके रेंजमध्ये संयुक्तपणे घेतली. या चाचणीत एटीजीएमने अत्यंत अचूकतेने लक्ष्य गाठण्यात यश मिळवले आणि ते पूर्ण केले. माहितीनुसार, टेलीमेट्री प्रणालीने एंटी टॅंक मिसाइलच्या उड्डाणाची समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे.

संरक्षण मंत्र्यांकडून अभिनंदनस्वदेशी बनावटीच्या अँटी-टँक गाइडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कर आणि संशोधन आणि विकास संस्थेचे ( DRDO) अभिनंदन केले असून, ही देशासाठी एक मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यामुळे सैन्याची ताकद वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पाशी संबंधित सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. असे संरक्षण मंत्री म्हणाले.