Galwan Clash: भारत आणि चीन या दोन देशांतील सैन्यादरम्यान गेल्या वर्षी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात हिंसाचार झाला होता. आता त्याचा एक व्हिडीओ चीनने रीलीज केला आहे. त्यामध्ये कॅप्टन सोयबा मनिग्बा हे चीनी सैनिकांना भारी पडताना दिसताहेत. आता मनिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी कॅप्टन सोयबा मनिग्बा यांचा सत्कार केला आहे.
कॅप्टन सोयबा मनिग्बा हे मनिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या धाडसाचे कौतुक करताना मनिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह म्हणाले की, "कॅप्टन सोयबा मनिग्बा यांचे कार्य राज्यासाठी आणि देशासाठी प्रेरणादायी आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी राज्याने आपले अनेक सुपुत्र दिले आहेत."
India-China Face Off : गलवान खोऱ्यात हिंसाचार, चीनचे चार जवान मृत्युमुखी, चीनकडूनच कबुली
कॅप्टन सोयबा मनिग्बा हे 16 बिहार रेजिमेन्टमध्ये कॅप्टन या पदावर कार्यरत असून चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीसोबत झालेल्या गलवान खोऱ्यातील हिंसाचारादरम्यान ते भारतीय सैनिकांचे नेतृत्व करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये कॅप्टन सोयबा मनिग्बा हे चीनच्या सैनिकांना कडाडून विरोध करताना दिसत आहेत.
कॅप्टन सोयबा मनिग्बा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी गलवानच्या खोऱ्यात भारत-चीन या दोन देशांच्या सैन्याची झडप झाली होती. त्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते.
India-China Border | एक पाऊल मागे! पँगाँगच्या उत्तर किनारी भागातून चीनची माघार, तंबूही हटवले