Punjab Assembly Election 2022 : अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद सच्चर (Malvika Sood Sachar) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा उद्या दुपारी केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालविका पंजाबमधील मोगा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू शकते. मालविकाला काँग्रेसमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी आणि हरीश चौधरी उद्या मोगा येथे जाणार आहेत. यावेळी अभिनेता सोनू सूदही उपस्थित राहणार आहे.


याआधी सोनू सूद म्हणाला होता, "सर्व पक्षांकडून ऑफर आहेत, परंतु एका आठवड्यात आम्ही पक्षाची निवड करू". गेल्या वेळी ही जागा काँग्रेसच्या हरजोत कमल यांनी जिंकली होती, मात्र मालविका आल्याने त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले. आज हरजोत कमल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले हरजोत पक्षाविरोधात बंडखोरी करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


मालविका सूद कोण आहे?
38 वर्षीय मालविका सूद ही अभिनेता सोनू सूदची सर्वांत लहान बहीण आहे. त्यांची मोठी बहीण मोनिका शर्मा अमेरिकेत राहते. संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली मालविका मोगा येथे इंग्रजी कोचिंग सेंटर चालवते. यासोबतच त्यांनी मोगा येथे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे.


मालविकाचे वडील शक्ती सागर सूद यांचे 2016 मध्ये आणि आई सरोजबाला सूद यांचे 2007 मध्ये निधन झाले. आई-वडिलांच्या स्मरणार्थ भावंडांनी सूद चॅरिटी फाउंडेशनची स्थापना केली. सोनूच्या वडिलांचे मोगा येथे बॉम्बे क्लॉथ हाऊस नावाचे कपड्यांचे दुकान होते. तसेच आई सरोजबाला सूद डीएम कॉलेज, मोगा येथे इंग्रजी शिकवायच्या.


संबंधित बातम्या


UPI Server Down: यूपीआय सर्व्हर डाऊन; ऑनलाईन डिजिटल पेमेंट व्यवहार ठप्प झाल्यानं ग्राहक वैतागले


Covid Update: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत साधणार संवाद, कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा


NEET PG Counselling: ठरलं! 'या' तारखेपासून सुरु होणार नीट पीजी काऊंसलिंग; केंद्रीय मंत्री मांडवियांची घोषणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha